नागपुरातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:26 AM2019-02-22T00:26:53+5:302019-02-22T00:28:13+5:30

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय.

Replacing Deputy Commissioner of police in Nagpur | नागपुरातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

नागपुरातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देरोशन यांना परिमंडळ चार तर भरणेंकडे वाहतुकीचा भार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी भरणे आणि रोशन यांची अंतर्गत बदली केली.
भरणे सध्या परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आहेत. यापूर्वी ते विशेष शाखेत असताना त्यांनी पासपोर्ट इमिग्रेशनच्या संबंधाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. पासपोर्टबाबतची संबंधित व्यक्तीची पडताळणी अवघ्या २४ तासात पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी भरणे यांनी बजावली. यातून पोलीस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अनेक दिवस विनाकारण तिष्ठत ठेवण्याच्या प्रक्रियेला फाटा देण्यात त्यांनी यश मिळवले. पोलीस पडताळणीची प्रक्रिया अवघ्या २४ तासात पूर्ण करणारे नागपूर शहर देशात पहिले ठरले आहे. दुसरे म्हणजे, परिमंडळ चारमधील रेतीमाफिया आणि अवैध धंदेवाल्यांवर अंकुश ठेवण्यातही त्यांनी यश मिळवले. अशाच प्रकारे नंदनवनमधील पाच जणांचे हत्याकांड तसेच अडीच कोटींच्या हवालाकांडाचा पर्दाफाश करण्याचीही कामगिरी उपायुक्त भरणे यांनी बजावली होती. अलीकडे शहरातील वाहतूक पोलिसांवर होणाºया हल्ल्याच्या घटना तसेच शहरातील बेशिस्त वाहतूक आणि ऑटोवाल्यांना लगाम घालण्यासाठी त्यांना वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
अशाच प्रकारे वाहतूक शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांना परिमंडळ चारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एक अभ्यासू, हसतमुख आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून तिलक यांनी ओळख निर्माण केली आहे. शहरातील विस्कळीत वाहतूक तसेच वाहतूक शाखेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला नियंत्रित करण्यासाठी रोशन यांनी विशेष परिश्रम घेतले. कर्तव्याऐवजी वसुलीला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांना वठणीवर आणण्याचेही त्यांनी बरेच प्रयत्न केले. आता त्यांच्याकडे परिमंडळातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांना सरळ करण्याची जबाबदारी आली आहे.
पवार ठाण्याला तर जाधव यवतमाळला
दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याही (ठाणेदार) बदल्या झाल्या आहेत. वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली झाली तर, तहसीलचे ठाणेदार वैभव जाधव यांची बदली यवतमाळला झाली आहे.

 

Web Title: Replacing Deputy Commissioner of police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.