निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:34 PM2019-01-10T20:34:08+5:302019-01-10T20:34:54+5:30

तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

Remember of Ram temple due to elections: Prithviraj Chavan | निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला दीक्षाभूमीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 


पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभाग येथे जनसंघर्ष यात्रेचे चार टप्पे झाले. पाचव्या टप्प्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गणेश टेकडी व ताजबाग येथेदेखील दर्शन घेण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नसीम खान, अनिस अहमद, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा प्रामुख्याने उपस्थित होते. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने सवर्ण आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मात्र जनतेने मागील साडेचार वर्षांत बराच त्रास भोगला आहे. त्यामुळे सवर्ण आरक्षणाने केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्राकडून जुमलेबाजी सुरू आहे. सवर्ण आरक्षणामुळेदेखील केंद्राला निवडणुकांत फारसा फायदा होणार नाही. येत्या काही दिवसांत पंतप्रधानांची जुमलेबाजी वाढेल. राफेल प्रकरणातील अंतिम सत्य लवकरच समोर येईल, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
यावेळी नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आशिष देशमुख, अनंत घारड, प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस रामकिशन ओझा, डॉ.बबन तायवाडे, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे, श्याम उमाळकर, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदींच्या काळात जनतेची अधोगती : राधाकृष्ण विखे पाटील
तीन राज्यांत पराभव झाल्यामुळे सवर्ण आरक्षण, जीएसटीचे दर कमी करणे इत्यादी पावले केंद्र शासनाने उचलली. मात्र प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यांची अधोगतीच झाली आहे. सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठीच आम्ही जनसंघर्ष करत आहोत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Remember of Ram temple due to elections: Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.