गावखेडे व दुर्गम भागातील दंत रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:33 PM2018-02-09T22:33:11+5:302018-02-09T22:36:44+5:30

शहराच्या तुलनेत गावखेड्यात व दुर्गम भागात दंत रुग्णांची संख्या मोठी आहे. हे रुग्ण आजार वाढल्यावरच रुग्णालयात येतात. अशा रुग्णांना त्यांच्या भागातच उपचार मिळावा, विशेषत: मूखपूर्व कर्करोगाचे निदान होण्यासाठी व याच्या जनजागृतीसाठी ‘मोबाईल डेन्टल व्हॅन’चा उपयोग होऊन रुग्णांना दिलासा मिळेल, असा सूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘मोबाईल डेन्टल व्हॅन’च्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी काढला.

Releaf of dental patients in rural and remote areas | गावखेडे व दुर्गम भागातील दंत रुग्णांना दिलासा

गावखेडे व दुर्गम भागातील दंत रुग्णांना दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय दंत रुग्णालय : मोबाईल डेन्टल व्हॅनचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या तुलनेत गावखेड्यात व दुर्गम भागात दंत रुग्णांची संख्या मोठी आहे. हे रुग्ण आजार वाढल्यावरच रुग्णालयात येतात. अशा रुग्णांना त्यांच्या भागातच उपचार मिळावा, विशेषत: मूखपूर्व कर्करोगाचे निदान होण्यासाठी व याच्या जनजागृतीसाठी ‘मोबाईल डेन्टल व्हॅन’चा उपयोग होऊन रुग्णांना दिलासा मिळेल, असा सूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘मोबाईल डेन्टल व्हॅन’च्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी काढला.
माजी खासदार अविनाश पांडे यांच्या निधीतून शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला ही व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली. शुक्रवारी या व्हॅनचा लोकार्पण सोहळा माजी खा. पांडे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वैभव कारेमोरे, जिल्हा नियोजन अधिकारी क्रिष्णा फिरके, माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे आदी उपस्थित होते.
या ‘व्हॅन’विषयी माहिती देताना डॉ. गणवीर म्हणाल्या,२५ लाख रुपयांची मोबाईल डेन्टल व्हॅन पूर्णत: वातानुकूलित आहे. यात दोन डेन्टल चेअर रुग्णसेवेकरीता लावण्यात आलेले आहेत. या व्हॅनमध्ये जनरेटर, कॉम्प्रेसर आदी उपकरणे लावलेली असून दंतशल्यगृह तयार करण्यात आलेले आहे. याशिवाय, व्हॅनमध्ये जनजागृतीकरिता एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहे. या माध्यमातून गावखेड्यात व दुर्गम भागात जनजागृती करण्यास मदत होईल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
संचालन डॉ. प्रकाश बंडीवार, पल्लवी कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. सचिन खत्री यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. महेश सानप, डॉ. हविशा आर्या, राजू तिजारे, अनुप शेवते आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Releaf of dental patients in rural and remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.