‘रोटा व्हायरस’ लसचा नियमित लसीकरणात समावेश : अतिसार रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:31 PM2019-05-10T23:31:59+5:302019-05-10T23:33:28+5:30

बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.

Regular vaccination of 'rota virus' vaccine includes: Prevention of diarrhea | ‘रोटा व्हायरस’ लसचा नियमित लसीकरणात समावेश : अतिसार रोखणार

‘रोटा व्हायरस’ लसचा नियमित लसीकरणात समावेश : अतिसार रोखणार

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स, कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. असीम इनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले, ‘रोटा व्हायरस’ हा विषाणू मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. ‘रोटा व्हायरस’ संसगार्चा आरंभ सौम्य अतिसाराने होऊन तो पुढे जाऊन गंभीर स्वरुप धारण करु शकतो. तसेच पुरेसा उपचार न मिळाल्यास शरीरांमध्ये पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन प्रसंगी बालकाचा मृत्यू देखील ओढावू शकतो. यासाठी ही लस मुलांना अनुक्रमे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांपर्यंत तीन वेळा तोंडावाटे द्यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
ही लस सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर सौम्य आणि तात्पुरती लक्षणे जसे उलटी, अतिसार, खोकला, सर्दी, चिडचिड इत्यादी लक्षणे दिसू शकतात. कुपोषित मुलांवर त्वरित उपचार न झाल्यास अतिसार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. यासाठी रोटा व्हायरस लसीकरण बालकांमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे, असे कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार म्हणाले.
लसीकरणाबाबत माहिती देतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स म्हणाले, भारतामध्ये जी मुले अतिसारामुळे रुग्णालयात भरती होतात, त्यापैकी ४० टक्के मुले रोटा व्हायरस संक्रमणाने ग्रस्त असतात. देशात ७८ हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. त्यापैकी ५९ हजार बालमृत्यू मुलांच्या पहिल्या दोन वर्षामध्ये होतो.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्या हस्ते रोटा व्हायरस या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यशाळेला वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन आणि आभार जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे यांनी केले.

Web Title: Regular vaccination of 'rota virus' vaccine includes: Prevention of diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.