विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:46 AM2018-08-30T00:46:44+5:302018-08-30T00:50:53+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.

Real tribute to Atalji's creation of Vidarbha | विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभुजी देशपांडे : लोकनायक बापुजी अणे जयंती साजरी

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.
लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व साप्ताहिक विदर्भ मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रणेते लोकनायक बापुजी अणे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीचे अ‍ॅड. अविनाश काळे, जनमंचचे प्रमोद पांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे ट्रस्टी विश्वास इंदूरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाले, विदर्भ हे नैसर्गिक संसाधनांनी भरलेले असून, आतापर्यंत महाराष्ट्र शासनात त्याचे दोहन झाले. कापसाच्या पिकामुळे विदर्भाची भरभराट होऊ शकते व पूरक उद्योगांचा विस्तार होऊ शकतो. टाटांनी बांबू उद्योगाकडे लक्ष वेधल्यानंतरच सरकारला जाग आली. ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर केवळ राज्यकर्ते बदलल्याची टीका करीत विदर्भाला कायम मागे राहावे लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. अविनाश काळे यांनी वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचा उल्लेख करीत ६८० किमीचा हा प्रकल्प करण्यासाठी सरकारजवळ इच्छाशक्ती नसल्याची टीका केली. लखमापूर धरणाच्या संदर्भातही दुर्लक्ष झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. विश्वास इंदूरकर म्हणाले, विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजपाच्या नेत्यांनी अ‍ॅफिडेव्हीट सादर केले होते, मात्र तेही बदलले आहेत. विदर्भासाठी जनमत नाही असे म्हणतात, मात्र आम्ही ९७ टक्के जनमत तयार केले होते. त्यामुळे आता विदर्भातील जनतेने निवडणुकीवर बहिष्कार घालून सत्ताधारी व विरोधकांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रवर विदर्भाचा शेष बसवावा व तो पैसा विदर्भाकडे वळविणे आवश्यक असल्याचे सांगत स्वतंत्र विदर्भासाठी राज्य सरकारची जबरदस्त इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. विदर्भ मिररचे अ‍ॅड. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.

Web Title: Real tribute to Atalji's creation of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.