नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:00 AM2018-10-20T01:00:26+5:302018-10-20T01:02:28+5:30

असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले.

Ravan's combustion in the gajar of Shriram in Nagpur | नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन

नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन

googlenewsNext
ठळक मुद्देकस्तुरचंद पार्कवर रामायण अवतरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले.
सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित ६७ व्या दसरा महोत्सवात रावण, कुंभकर्ण व मेघनादच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांचे दहन करण्यात आले. फटाका शो झाला. राजाबाक्षा मंदिर मैदानातही रावण दहन करण्यात आले.

पूर्व समर्थनगर
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग १६ तर्फे विजयादशमीच्या निमित्ताने मनपा प्रांगण, पूर्व समर्थनगर, जुनी अजनी येथे रावण दहन व रामलीला आयोजित करण्यात आली. फोरमचे हे २३ वे वर्ष होते. हेमराज बिनावार यांनी ४० फूट उंचीची रावणाची प्रतिकृती तयार केली. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन माजी आ. दीनानाथ पडोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. धोंडीबाजी परसराम करवटकर यांचा नेत्रदीपक फटाका शो सादर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आयोजक संग्राम पनकुले व सुदर्शन पनकुले यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. रामलीलाचे आयोजन संजीवनी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती , माजी आ. सागर मेघे , अशोक मानकर, सुनील रायसोनी, राजू अग्रवाल, मिकी अरोरा, देवीलाल जयस्वाल, जयसिंह चौहान, गिरीष पांडव, योगेश कुंभलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत देवीदास घोडे, तात्यासाहेब मते, सोपानराव शिरसाट, विक्रांत तांबे, संजय शेवाळे, श्रीनिवास दुबे, प्रा . बबलू चौहान, योगेश चौधरी, प्रमोद वानकर, मंदार हर्षे प्रल्हाद वाहोकर, प्रा. पद्माकर सावरकर, मच्छिंद्र आवळे, चेतन मस्के, विलास पोटफोडे, विजय मसराम, सूरज बोरकर, गीतेश चरडे आदिंनी परिश्रम घेतले.

राजीव गांधी पार्क गणेशनगर

राजीव गांधी पार्क गणेशनगर येथे पारंपरिक रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला. नवज्योत क्रीडा मंडळाच्यावतीने माजी नगरसेवक प्रशांत धवड हे मागील १५ वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करतात. यंदा ३० फुटाच्या रावणाची प्रतिमा उभारण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढे, संजय रणदिवे, नीता ठाकरे, सुजाता कोंबाडे, बॉबी धोटे, प्रकाश ठाकरे, दीपक गुर्वे, उल्हास कामुने, शिरीष लढ्ढा, किशोर गीत, अमृत जैन, राजू खोपडे, दीपक कुर्वे, पापा पुर्लेवार आदी उपस्थित होते. 

Web Title: Ravan's combustion in the gajar of Shriram in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.