राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:41 AM2018-07-18T00:41:53+5:302018-07-18T00:42:58+5:30

गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

In the Rashtriya Lokadalat, the cases disposed off up to one and a half lakh | राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

Next
ठळक मुद्देराज्यातील आकडेवारी : पीडितांना मिळाली ४९३ कोटीची भरपाई

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ पैकी २९ हजार ७०३, नाशिक जिल्ह्यात १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७, पुणे जिल्ह्यात ६५ हजार १४७ पैकी २५ हजार ७६५, रायगड जिल्ह्यात ५७ हजार ७७४ पैकी १६ हजार ९२८, जळगाव जिल्ह्यात १ लाख २१ हजार ८३९ पैकी १६ हजार ६३७, नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २०९ पैकी ६ हजार ७६९, मुंबई जिल्ह्यात २० हजार ५३५ पैकी ५ हजार ९१३, धुळे जिल्ह्यात १८ हजार ८४६ पैकी ४ हजार ८३९, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५७३ पैकी २ हजार १८३, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार ९५५ पैकी १ हजार ८३५, सांगली जिल्ह्यात २६ हजार २६२ पैकी १ हजार ७१६, भंडारा जिल्ह्यात ११ हजार २५२ पैकी १ हजार ६९१, बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ३५९ पैकी १ हजार ३८०, अहमदनगर जिल्ह्यात २२ हजार ८८२ पैकी १ हजार २५२, बिड जिल्ह्यात ६ हजार ६९१ पैकी १ हजार ७६, कोल्हापूर जिल्ह्यात ३१ हजार ४३ पैकी १ हजार ४५ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ४९१ पैकी १ हजार १० प्रकरणे निकाली निघाली. इतर जिल्ह्यात हजारापेक्षा कमी प्रकरणे निकाली निघाली.

उच्च न्यायालयातील स्थिती
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपीठातील ७२९ पैकी ८१, नागपूर खंडपीठातील ४६० पैकी १७३ तर, औरंगाबाद खंडपीठातील ४३० पैकी ३५३ प्रकरणे निकाली निघाली. पीडितांना मुंबईमध्ये ४७ लाखावर, नागपूरमध्ये ७ कोटी ४८ लाखावर तर, औरंगाबादमध्ये २ कोटी ६ लाख रुपयांवर भरपाई मिळाली.

Web Title: In the Rashtriya Lokadalat, the cases disposed off up to one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.