बलात्कार पीडितेला करायचाय गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 08:57 PM2018-03-23T20:57:19+5:302018-03-23T20:57:29+5:30

मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे घर कामगार महिला गर्भवती राहिली आहे. आधीच दोन मुलांची आई असलेल्या त्या महिलेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. तिच्या पोटात वाढत असलेला गर्भ २९ आठवड्यांचा झाला आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारला यावर २७ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

Rape victim wants to abortion | बलात्कार पीडितेला करायचाय गर्भपात

बलात्कार पीडितेला करायचाय गर्भपात

Next
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : घर मालकाच्या कूकर्माची बळी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे घर कामगार महिला गर्भवती राहिली आहे. आधीच दोन मुलांची आई असलेल्या त्या महिलेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. तिच्या पोटात वाढत असलेला गर्भ २९ आठवड्यांचा झाला आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारला यावर २७ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
आरोपीदेखील दोन अपत्यांचा बाप आहे. पीडित महिला त्याच्या घरात सकाळी ६ ते १० या वेळात ३५० रुपये हप्त्याप्रमाणे काम करीत होती. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी आरोपीने महिलेला कार्यालयाची साफसफाई करण्यास सांगितले. दरम्यान, त्याने महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरोपीच्या पत्नीकडे त्याच्या वाईट वागणुकीची तक्रार करून काम सोडून दिले. दोन दिवसांनंतर आरोपीचा मुलगा व सून महिलेला समजावण्यासाठी गेले व त्यांनी महिलेला कामावर परत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेवर बलात्कार केला व त्याची वाच्चता कुठे केल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. परिणामी, महिलेने आरोपीच्या घरचे काम सोडून दिले. दोन महिन्यांनंतर महिलेने धाडस करून आरोपीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. परंतु, त्यांनी महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही व तिला जबर मारहाण केली. दुसरीकडे आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी पाच हजार रुपये दिले. दरम्यान, सामान्य मार्गाने गर्भपात करणे शक्य न झाल्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
----------------
चार ठिकाणी दिल्या तक्रारी
पीडित महिलेने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक व खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिला न्यायाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Rape victim wants to abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.