नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:48 PM2018-01-13T23:48:04+5:302018-01-13T23:53:11+5:30

वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो.

Rakesh Raut cheated five banks in Nagpur | नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा

नागपुरात ठगबाज राकेश राऊतचा पाच बँकांना गंडा

Next
ठळक मुद्देकर्जासाठी एकाच सदनिकेची कागदपत्रेएक कोटीची रक्कम उचलली : तहसील ठाण्यात गुन्हा दाखल



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो.
आरोपी राकेश हा स्वत:ला कॉन्ट्रॅक्टर आणि आॅटोमोबाईल्सचा मालक सांगतो. आपले सेंट्रल एव्हेन्यूवर आॅटोमोबाईल्स आहे, अशीही बतावणी करतो. तो बनावट कागदपत्रे तयार करण्यात पटाईत आहे. या व्यवसायाची बनावट कागदपत्रे तयार करून त्याने लाखोंची आर्थिक उलाढाल दर्शविणारी कागदपत्रे बँकांमध्ये सादर केली होती. त्या आधारे त्याने गांधीबागमधील यूको बँकेच्या शाखेत गजानन अपार्टमेंट, म्हाळगीनगरमध्ये सदनिका विकत घेण्यासाठी ५ आॅक्टोबर २०१५ ला कर्ज प्रकरण सादर केले. १० दिवसात विक्रीपत्र नोंदणी क्रमांक एनजीएन एस- ३६१४ सादर केले तसेच अन्य कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर १६ आॅक्टोबरला त्याने १८ लाखांची रक्कम बँकेतून उचलली. ही रक्कम उचलल्यानंतर त्याने बँकेकडे फिरकणे बंद केले. त्याचे कर्जाचे हप्ते थकल्याने बँक अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पत्नीचाही सहभाग
पुढच्या चौकशीत ठगबाज राकेशने विक्रीपत्र नोंदणी क्रमांक एनजीएन एस- ३६१४ च्या आधारेच बँक आॅफ महाराष्टच्या सहकारनगर शाखेतून, स्टेट बँकेच्या किंग्सवे शाखेतून, पंजाब नॅशनल बँकेच्या सूर्यनगर, कळमना शाखेतून आणि इंडियन ओव्हरसिज बँकेच्या हुडकेश्वर शाखेतून प्रत्येकी १८ ते २२ लाख अशी कर्जाची रक्कम उचलली. आरोपी राकेश राऊतच्या या बनवाबनवीत त्याची पत्नी ललिता हिनेही हातभार लावल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढला आणि राकेशसोबतच तिच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राकेशला अटक करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Rakesh Raut cheated five banks in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.