पारडी उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह : बांधकामाची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 09:28 PM2019-07-16T21:28:45+5:302019-07-16T21:32:21+5:30

पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत.

Question mark on the completion of Paradi flyover: slow speed of construction | पारडी उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह : बांधकामाची गती संथ

पारडी उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह : बांधकामाची गती संथ

Next
ठळक मुद्दे‘एनएचएआय’ने पुढाकार घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत. 


ऑगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजन
सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारडी अंडरब्रीजचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाला उड्डाणपुलामध्ये रूपांतरित करण्यात आले होते. भूमिपूजनाला पाच वर्षे पूर्ण झाली असून अजूनही पुलाचे काम अपूर्ण आहे. बांधकामाचे चुकीचे नियोजन आणि संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे या भागातील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. बांधकाम सुरू असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचा एनएचएआय आणि लोकप्रतिनिधींवर काहीही परिणाम झालेला नाही.
बांधकाम जीडीसीएल व एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्यावर विविध पक्ष आणि नागरिक संघटनांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. बरेचदा महामार्गावरील वाहतूक थांबविली होती. भंडारा रोडवर दोन्ही बाजूला लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातून वाहन काढणे अत्यंत जोखिमेचे काम आहे. रस्त्यावरून पायदळ चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पारडी उड्डाण पुलाच्या अपूर्ण विकासकामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना फटकारले आहे. पण कारणे सांगून मंत्र्याच्या आदेशाकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.
रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य 

सदर प्रतिनिधीने कळमना मार्ग आणि भंडारा महामार्गावरील उड्डाण पुलाची पाहणी केली असता बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार नाहीच, अशी स्थिती आहे. कळमना मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पारडी चौकातून कळमना मार्केटकडे जाणारा एक बाजूचा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ट्रकची वाहतूक असल्यामुळे धूळ उडते. दुचाकी वाहनचालकांना थोडावेळ थांबूनच जावे लागते.
पारडी चौकापासून भंडारा महामार्गावर जवळपास एक कि़मी. अंतरावर पूनापूर मंदिराकडे जाणाºया वळण रस्त्यापर्यंत बांधकामाच्या दोन्ही बाजूला बॅॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच अतिक्रमणाची भर पडली आहे. त्यामुळे १२ मे रोजी एका डम्परच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा अपघातात मृत्यू झाला होता. उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेले पिल्लर अर्धवट आहेत. या महामार्गावर जड वाहनांची वाहतूक निरंतर सुरू असते. हा मार्ग गंभीर अपघातासाठी ओळखला जातो. बांधकाम पूर्ण करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
उड्डाण पुलाची वैशिष्ट्ये

  •  ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
  •  ४४८ कोटींची गुंतवणूक.
  •  मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  मार्च २०१९ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचे लक्ष्य.
  •  डिसेंबर २०१८ मध्ये ३० टक्के बांधकाम.


डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणार
पारडी आणि कळमना उड्डाण पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. पारडी नाका ते इतवारी जैन मंदिर, वैष्णोदेवी चौक, कळमना मार्केट येथे उड्डाण पूल होणार आहे. सध्या बांधकाम वेगात सुरू आहे. प्रकल्पासाठी हवी असलेली जागा मनपाने एनएचएआयला अजूनही हस्तांतरित केलेली नाही.
नीलेश येवतकर, प्रकल्प संचालक (पीआययू-१),
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

Web Title: Question mark on the completion of Paradi flyover: slow speed of construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.