प्यार, इश्क, मोहब्बत...तरुणाईत ‘व्हॅलेन्टाईन डे’चा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 09:56 PM2019-02-13T21:56:04+5:302019-02-13T21:57:18+5:30

मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ मानला जातो, ‘व्हॅलेन्टाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड मग ते आई-वडिलांपासून बहीण-भावंड, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, एवढा उदात्त हेतू असूनही फक्त रोमँटिक डे एवढेच स्वरूप आले आहे. प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेन्टाईन डे’चा संदेश आहे.

Pyaar, Ishq, Mohabbat ... The excitement of 'Valentine's Day' in the youth | प्यार, इश्क, मोहब्बत...तरुणाईत ‘व्हॅलेन्टाईन डे’चा उत्साह

प्यार, इश्क, मोहब्बत...तरुणाईत ‘व्हॅलेन्टाईन डे’चा उत्साह

Next
ठळक मुद्देआज ‘दिल से मिलेंगे दिल’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ मानला जातो, ‘व्हॅलेन्टाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड मग ते आई-वडिलांपासून बहीण-भावंड, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, एवढा उदात्त हेतू असूनही फक्त रोमँटिक डे एवढेच स्वरूप आले आहे. प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेन्टाईन डे’चा संदेश आहे.
‘व्हॅलेन्टाईन डे’ म्हटला की तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. प्रेमवीरांना हा हक्काचा दिवस वाटतो. परंतु या दिवसाला दरवर्षी निरनिराळ्या संघटनांकडून होणारा विरोध पाहता ‘प्यार के साईड इफेक्ट्स’ नको म्हणून अनेक ‘कपल्स’नी बुधवारी सायंकाळीच ‘व्हॅलेन्टाईन’ साजरा केला. शहरातील तरुणाईच्या कट्ट्यांवर कुणी ‘दिल ही दिल में मुस्कुरा रहा था’ तर कुणी ‘प्यार किया तो निभाना’ची शपथ देत होता. ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणणाऱ्या ‘कपल्स’ने मात्र कु णालाही न घाबरता १४ तारखेलाच ‘व्हॅलेन्टाईन’सोबतच साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
कॉलेजच्या कट्ट्यांवर फुलणारे प्रेम आता आॅनलाईन चावडीवर येऊन पोहोचले आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ व ‘फेसबुक’वर प्रेमसंदेशाची देवाणघेवाण करण्याचा काळ असतानादेखील ‘व्हॅलेन्टाईन डे’साठी आपल्या जिवलगाला ‘गिफ्ट’ देण्यासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे. बाजारात गेल्यानंतर हमखास तरुणाईचे अड्डे असणाºया दुकानांमध्ये लाल आणि गुलाबी रंगांची उधळण होताना दिसते आहे. फूल असो, गिफ्ट असो, टेडीबिअर असो किंवा पेन. इतकेच काय पण ‘गिफ्ट पॅकिंग’ पेपरदेखील याच रंगांमध्ये दिसून येत आहे. कुणी ‘फोटो फ्रेम्स’ व ‘पझल्स’चा पर्याय स्वीकारला तर कुणी ‘चॉकलेट’च्या गोडव्याने जोडीदाराला ‘इम्प्रेस’ करण्याचा बेत केला आहे. गोकुळपेठ, सीताबर्डी, सदर येथील दुकानांमध्ये गुरुवारी दिवसभर गर्दी दिसून आली. ‘आॅनलाईन शॉपिंग’च्या माध्यमातून ग्रिटींग कार्ड, टेडिबिअर, आकर्षक ज्वेलरी, डिझानयर वॉच, संगीतमय थ्रीडी बुकलेट्स, लव्ह मीटर, हार्टच्या आकाराचे कुशन्स इत्यादी प्रकारच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देण्याकडे कल दिसून येत आहे. याशिवाय मोबाईल फोन्स, हार्टच्या आकाराच्या ‘पेन ड्राईव्ह’ला देखील मागणी आहे.
‘रेड रोझ’ची मागणी वाढली
व्हॅलेन्टाईन डे ला प्रियकराने प्रेयसीला कुठलेही ‘गिफ्ट’ दिले तरी शेवटी प्रत्येकजण ‘रेड रोझ’ सोबत देतोच. प्रेमाचे प्रतीक असलेले टवटवीत असे गुलाबाचे फूल पाहून प्रेयसीच्या गालावरदेखील नकळतपणे गुलाबी छटा उमटते आणि दोघांचेही ‘दिल गार्डन गार्डन’ होते. बाजारातील फुलमार्केटमध्ये बाहेरून मागविण्यात आलेल्या गुलाबांना मोठी मागणी असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली आहे. चौकाचौकात गुलाबाच्या फुलांनी व पुष्पगुच्छांनी दुकाने सजलेली आहेत.
‘सोशल व्हॅलेन्टाईन’
दरम्यान एकीकडे ‘यंगिस्तान’मध्ये ‘व्हॅलेन्टाईन डे’चा उत्साह दिसून येत असला तरी दुसरीकडे शहरातील सामाजिक संघटनांनीदेखील अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. काहींनी वृद्धाश्रमात जाऊन तेथे ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर कुणी रक्तदानाच्या माध्यमातून समाजापर्यंत जीवनातील प्रेमाचा प्रसार करणार आहेत. याशिवाय पर्यावरणासंदर्भात जागृती करण्याचादेखील मानस काही संघटनांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : ४०० पोलीस तैनात
व्हॅलेंटाईन डे ला धुडगूस घालणाऱ्या आरोपींवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. छेडखानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी फुटाळा आणि अंबाझरी तलावावर ५ अधिकारी आणि ५० पोलिसांना तैनात केले आहे.
व्हॅलेंटाईन डेची युवकांमध्ये खूप क्रेझ आहे. या दिवशी गोंधळ घालण्याच्या घटना घडतात. यामुळे पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेसाठी तयारी केली आहे. व्हॅलेंटाईन डे साठी सदर, सीताबर्डी, अंबाझरी ठाण्यात सर्वाधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. फुटाळा, अंबाझरी तलाव, वेस्ट हायकोर्ट रोड, लॉ कॉलेज चौक, धरमपेठ, सदरचे व्हीसीए, पुनम चेंबरसह मोठ्या मॉलमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांना धुडगूस घालणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच महिलांची छेड काढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दामिनी पथकासह अतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. या महिला कर्मचारी साध्या वेशात गर्दीच्या ठिकाणी फिरून छेडखानी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर तुरुंगात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक विभागही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार आहे.

 

Web Title: Pyaar, Ishq, Mohabbat ... The excitement of 'Valentine's Day' in the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.