सीसीटीव्हीमुळे चार तासात पर्स पळविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:39 AM2018-09-15T00:39:55+5:302018-09-15T00:52:53+5:30

एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला.

Purse snacher round in four hours due to CCTV | सीसीटीव्हीमुळे चार तासात पर्स पळविणारा गजाआड

सीसीटीव्हीमुळे चार तासात पर्स पळविणारा गजाआड

Next
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला.
सारिका प्रभात परिहार (३६) रा. एम. आय. जी २४२, चिरहुला कॉलनी, रिवा मध्य प्रदेश या आपल्या कुटुंबीयांसह एसी वेटिंग हॉलमध्ये झोपल्या होत्या. झोपेतून उठल्यानंतर त्यांना आपली पर्स चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदविली. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, रजनलाल गुर्जर, केदार सिंह, विवेक कनोजिया, विकास शर्मा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आरोपी पर्स घेऊन टेकडी मंदिराकडे जाताना दिसला. आरपीएफचे जवान रजनलाल गुजर, केदार सिंह यांना सकाळी १०.३० वाजता आरोपी संत्रा मार्केटकडील भागातील पार्किंगजवळ फिरताना दिसला. लगेच त्यास अटक करण्यात आली. त्याच्या जवळ १४०० रुपये रोख, एका महिलेचा चष्मा, मोबाईल, मोटारसायकलची चावी आढळली. चोरी केल्यानंतर पर्समधील पैसे, मोबाईल काढून पर्स एमपी बसस्टँडकडील भागात फेकल्याची कबुली त्याने दिली. लगेच आरपीएफने पर्स फेकलेल्या ठिकाणी जाऊन पर्स ताब्यात घेतली. त्यानंतर आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

Web Title: Purse snacher round in four hours due to CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.