लोकाभिमुख अधिकारी : अश्विन मुद्गल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:25 PM2019-02-04T13:25:22+5:302019-02-04T13:25:49+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे.

Public orientated Officer: Ashwin Mudgal | लोकाभिमुख अधिकारी : अश्विन मुद्गल

लोकाभिमुख अधिकारी : अश्विन मुद्गल

Next



लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे. एक पारदर्शी व लोकाभिमुख कारभारासह प्रयोगशील अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपूर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक वर्ष त्यांनी मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. ते सध्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांनी वेग घेतला आहे. प्रशासकीय कौशल्य, जनतेशी जुळलेली नाळ, कामाची हातोटी आणि सदैव कामासाठी तत्पर असलेले मुद्गल आदर्श अधिकारी म्हणून गणले जातात.
मनपा आयुक्त असतांना त्यांनी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी ‘न्युसन्स डिटेक्शन स्क्वॉड ’निर्माण केले. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना दंड आकारण्याचे काम हे पथक करायचे. त्यांच्याच कार्यकाळात केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराला ‘हागणदारी मुक्त’शहर घोषित केले. ‘स्वच्छ नागपूर’कडे शहराची वेगाने घौडदौड सुरू आहे. शहरातील गरजू व गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने २९ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण हाती घेण्यात आली आहे. यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्हधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारवर अधिक लक्ष दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पांदण रस्ते बांधण्याचे नियोजन करून प्रत्येक तालुक्याला टार्गेट ठरवून दिले आहे. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नागपुरात प्रत्यक्ष बंधकामाला सुरुवात त्यांच्याचमुळे शक्य झाले आहे. त्यांच्याच नेतृत्वात आर्थिक स्थितीतून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी थकीत कर वसुलीसाठी थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात आली. ७० टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर निर्धारणाची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कारभारात पारदर्शता आणली. राज्य सरकार व महमंडळाकडे प्रलंबित असलेला महापालिकेचा निधी प्राप्त क रण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश मिळाले.
गणेशोत्सवात शहरातील तलाव व नद्यांचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होते. याला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या विविध भागात २०० कृत्रिम टँक तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून विसर्जनाची घरपोच व्यवस्था करण्यात आली. यामुळे भाविकांची सुविधा झाली. सोबतच प्रदूषणालाही आळा बसला. दीक्षाभूमी येथील कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. गर्दी विचारात घेता परिसराची स्वच्छता व उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहरात दररोज ४०० ते ४५० एमएलडी सांडपाणी निर्माण होते. यातील १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून महाजनकोला दिले जाते. यातून वर्षाला महापालिकेला १५ कोटी मिळतात. पुन्हा २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांनी या प्रकल्पाला गती मिळाली आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वीज निर्मिती प्रकल्पात वापर केला जााणार आहे. यातून महापालिकेला वर्षाला २० कोटींचे उत्पन्न होणार आहे. अशा प्रकारे सांडपाण्यातून वर्षाला ३५ कोटी मिळणार आहे.

नियमित घेतात विकासकार्यांचा आढावा
अश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात ‘स्मार्ट सिटी’चा महत्वाचा भाग असलेल्या शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना गती मिळाली. कविवर्य सुरेश भट सभागृहाचे काम रखडले होेते. अश्विन मुदगल यांनी प्रत्येक आठवड्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊ न अत्याधुनिक अशा सभागृहाचे काम पूर्ण केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. नागनदी प्रकल्प व ऑरें सिटी स्ट्रीट  प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे. शहरातील महापालिके च्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप केले जाणार आहे. ते प्रत्येक विकासकामात जातीने स्वत: लक्ष घालतात व नियमितपणे विकासकार्यांचा आढावा घेतात.

Web Title: Public orientated Officer: Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.