पंतप्रधान नागपूरच्या मेट्रो रेल्वेत बसणार, मेट्रो धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:23 AM2019-01-23T01:23:16+5:302019-01-23T01:24:10+5:30

मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महामेट्रोच्या उद्घाटनाची तयारी वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मेट्रोत बसणार आणि मेट्रो धावणार असे चित्र आहे. मेट्रो रेल्वेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता, हे विशेष.

The Prime Minister will board sit in the Nagpur metro railway and run the metro | पंतप्रधान नागपूरच्या मेट्रो रेल्वेत बसणार, मेट्रो धावणार

पंतप्रधान नागपूरच्या मेट्रो रेल्वेत बसणार, मेट्रो धावणार

Next
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते सीताबडीपर्यंत व्यावसायिक रन

मोरेश्वर मानापुरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महामेट्रोच्या उद्घाटनाची तयारी वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मेट्रोत बसणार आणि मेट्रो धावणार असे चित्र आहे. मेट्रो रेल्वेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता, हे विशेष.
सरासरी ९८ टक्के काम पूर्ण
या दृष्टीने मेट्रोचे बांधकाम वेगात सुरू आहे. एकूण १० वर्गवारीपैकी सात विभागाचे काम १०० टक्के अर्थात ५५८ पाईल, २६६ ओपन फाऊंडेशन, १२७ पाईल कॅप, ३५६४ सेगमेंट कास्टिंग, १४९ आय-गर्डर कास्टिंग, १४९ आय-गर्डर लॉन्चिंग आणि ३३ डेक स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ३९३ पिअरपैकी ३८८ पिअर (९८.७३ टक्के), ३१८ पाईप कॅप व पोर्टलपैकी ३०८ (९६.८६ टक्के) आणि ३४५ सेगमेंट लॉचिंगपैकी ३०९ चे (८९.५७ टक्के) काम पूर्ण झाले आहे.
‘सीआरएस’तर्फे लवकरच परीक्षण
रिच-१ च्या १२.८७० कि़मी. मार्गावर लवकरच खापरी ते एअरपोर्ट साऊथप्रमाणेच प्रवाशांच्या वजनाएवढे रेतीच्या वजनाचे पोते टाकून ऑसिलेशन ट्रायल रन होणार आहे. त्याकरिता लखनौ येथील रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायाझेशनची (आरडीएसओ) चमू येणार आहे. त्यानंतर कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीतर्फे (सीआरएस) फायरच्या अटी, रोलिंग स्टॉल आणि विविध बाबींचे परीक्षण करण्यात येणार आहे. सीआरएसच्या मंजुरीनंतर मेट्रो रेल्वे व्यावसायिकरीत्या धावण्यासाठी तयार होणार आहे. ट्रॅकचे काम १० दिवसात तर उर्वरित कामे १५ ते २० दिवसात पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकूण ११ स्टेशन, १२.८७० कि़मी.
खापरी ते सीताबर्डी मेट्रो रेल्वे मार्ग १२.८७० कि़मी.चा असून या मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. यामध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जेपी नगर, छत्रपती स्टेशन, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर, सीताबर्डी.
फेब्रुवारी अखेरीस व्यावसायिक रन
निर्धारित मार्च महिन्याऐवजी फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते सीताबर्डीपर्यंत व्यावसायिक रन सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्याची तयारी जोमात आहे. बांधकाम वेगात सुरू आहे. तिकीट दर २०१४ मध्ये ठरल्यानुसार राहतील.
डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.

Web Title: The Prime Minister will board sit in the Nagpur metro railway and run the metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.