पंतप्रधानांनी साधला वीज ग्राहकांशी संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:38 AM2018-07-20T01:38:34+5:302018-07-20T01:39:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यंत ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्राच्या ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरिन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक केले.

The Prime Minister communicated with the power consumers | पंतप्रधानांनी साधला वीज ग्राहकांशी संवाद 

पंतप्रधानांनी साधला वीज ग्राहकांशी संवाद 

Next
ठळक मुद्देसौभाग्य योजनेतील कामाबदल महाराष्ट्राचा गौरव : घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचे पुनश्च कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यंत ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्राच्या ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरिन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक केले. अशा कामांचा देशाला अभिमान वाटतो, असेही ते यावेळी म्हणाले. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही उपस्थित होते. पंतप्रधानांनी याप्रसंगी महावितरणने केलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरण कामाचे विशेषत्वाने कौतुक केले. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१८ च्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात घारापुरी बेटाच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले होते. नागपूर जिल्ह्यातील सुमारे २५ लाभार्थ्यांशी थेट सवांद साधला. यावेळी कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता उमेश शहारे. मनीष वाठ, नारायण आमझरे, हरीश गजबे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, दिलीप घाटोळ आदी अधिकारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

Web Title: The Prime Minister communicated with the power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.