वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 09:29 PM2018-02-17T21:29:12+5:302018-02-17T21:33:21+5:30

प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.

In the present life teaching Tibetan film 'The Cup' | वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’

वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रपट महोत्सव : दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.
द कप हा तिबेटीयन भाषेतील चित्रपट आहे. रिनपोचे या जगविख्यात दिग्दर्शकने हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाने स्क्रीन इंटरनॅशनल पुरस्कारही पटकावला आहे.
दोन तिबेटीयन भाऊ पळून भारतात येतात. हिमाचल प्रदेशातील एका बुद्ध मॉनेस्ट्रीमध्ये ते राहू लागतात. दोन्ही भाऊ अतिशय खोडकर असतात तर मॉन्स्ट्रीचे शिक्षक भिक्खू हे अतिशय शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असतात. फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू होणार असतो. दोन्ही भाऊ फुटबॉलसाठी अतिशय वेडे असतात. त्यांना वर्ल्ड कप पाहायचा असतो परंतु मॉनेस्ट्रीमध्ये टीव्ही नसतो. तेथील शिक्षकांचीही त्याला परवानगी नाही. दोन्ही मुलासोबत राहून मॉनेस्ट्रीमधील इतर सर्व मुलांनाही फुटबॉलचे आकर्षण वाढते. त्यांनाही वर्ल्ड कपचे सामने पाहायचे असतात. मग दोन्ही भाऊ एकेक पैसे जमा करतात. डीश अ‍ँन्टीना आणतात आणि सर्वजण मिळून फुटबॉलचे सामने टीव्हीवर पहातात. फुटबॉलचा वर्ल्ड कप पाहण्यासाठी या मुलांची सुरू असलेली धडपड पाहून अखेर टीचरही त्यासाठी तयार होतात. आपले नियम बाजूला ठेवून तेही सामन्यांचा आनंद घेतात, अशी ही या चित्रपटाची कथा आहे. भाषा समजत नसली तरी भावस्पर्शी कथानकाने नागपूरकर रसिकांच्याही मनात चित्रपटाने हात घातला.
तत्पूर्वी डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सुनील तलवारे, धम्मचरी ऋतायुष, अश्विन कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. अजय ढोके यांनी भूमिका विषद केली. पायल ढोके यांनी संचालन केले. स्मिता जाधव यांनी आभार मानले.
आज ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव ’
चित्रपट महोत्सवात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सोमनाथ वाघमारे यांनी हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटापूर्वी सोमनाथ वाघमारे हे नागपूरकर रसिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत दुपारी दुपारी ३ वाजता जपान देशात नोकरीच्या संधी याविषयावर कार्यशाळा होईल.

Web Title: In the present life teaching Tibetan film 'The Cup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.