प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:57 PM2019-07-08T23:57:45+5:302019-07-08T23:58:28+5:30

निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.

Pramod Manmode's entry into Congress | प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार सेवक वाघाये, अनंत घारड प्रामुख्याने उपस्थित होते. चव्हाण यांनी मानमोडे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. काँग्रेस पक्ष बळकट करण्यात तसेच पक्षाला जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात नेण्यात प्रमोद मानमोडे हे मौलिक भूमिका पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसला गौरवशाली इतिहास लाभला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडू, असे मानमोडे यांनी सांगितले.

Web Title: Pramod Manmode's entry into Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.