भंडाऱ्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:15 PM2018-04-14T23:15:21+5:302018-04-14T23:15:38+5:30

भंडारा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १३) रात्री ९.१५ वाजता धाड टाकली.

Police raid on cricket betting in Bhandara | भंडाऱ्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

भंडाऱ्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

Next
ठळक मुद्दे१७ जणांना अटक नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १३) रात्री ९.१५ वाजता धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. तेथून १७ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल २६ लाख ७९ हजार ४४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपींकडून तब्बल १ लाख ४ हजार १३३ रुपये जप्त केले. त्यातही भंडारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून नागपूरच्या पथकाने भंडारा येथे जाऊन ही कारवाई केली असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये १५ आरोपी हे नागपुरातील आहे. उर्वरित दोनपैकी एक भंडारा येथील तर दुसरा हा गोंदिया येथील रहिवासी आहे. शेख अमजद शेख रमजान (३२, रा. शांतिनगर, इतवारी), राजू सत्यनारायण अग्रवाल (४३, रा. एनआयटी कॉम्प्लेक्स, पारडी चौक), प्रवीण करणलाल गुप्ता (४०, रा. भवानीनगर, पारडी), अमन किशोर कपूर (३१, रा. कुंभारपुरा, इतवारी), विवेक आनंद जयस्वाल (२६, रा. छोटी मशीदजवळ, सदर), कुलदीपसिंग जागीरासिंग गिट्टल (३५, बाबादीप नगर), गोपाल भय्याजी कडू (२६, रा. कामगार नगर, नारी रोड), प्रमोद भाऊराव डोंगरे (४५, रा. महालक्ष्मीनगर, मानेवाडा रोड), राहुल सुरेंद्र जैन (३६, रा. बापूराव गल्ली, इतवारी), गज्जू मदनलाल अग्रवाल (३७, नेताजीनगर, कळमना रोड), अर्जुन अमरदीपसिंग राजपूत (२८, रा. मोहम्मद रफी चौक, एकता चौक, यशोधरानगर), मनोज गुरुमुख आलवानी (३२, जरीपटका), आशिष राजेश चौरसिया (२७, रा. कांजी हाऊस चौक, मंगळवारी रोड), लालचंद आत्माराम इंदनानी (४६, रा. संतकृपा निवास, जरीपटका), लक्ष्मण गोपालदास हरचंदानी (४६, रा. रितेश पॅलेस, जरीपटका) अशी नागपुरातील आरोपींची नावे असून फिरोज बदु्रद्दीन मैदानी (५०, रा. लक्ष्मीबाई वॉर्ड, स्टेडियम रोड, मशीदजवळ, गोंदिया) आणि घरमालक प्रेमदास मोहन रंगारी (६२, रा. म्हाडा कॉलनी, भंडारा) अशी इतर दोघांची नावे आहेत.

भंडारा पोलीस अनभिज्ञ
नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथे धाड टाकून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या १७ जणांना अटक केली. अलीकडच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यातही आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा २६ लाखांएवढा आहे. विशेष म्हणजे, भंडारा येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेटवर सट्टा लावला जात असताना भंडारा पोलिसांना याची कुणकुण लागली नाही का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.

Web Title: Police raid on cricket betting in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.