पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:22 AM2017-07-24T02:22:47+5:302017-07-24T02:22:47+5:30

पतंग काढण्यासाठी शेताच्या कुंपणाच्या तारांना स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि

Police filed complaint against Patiala | पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

सचिन गुरनुले मृत्यूप्रकरण : विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मौदा/कोदामेंढी : पतंग काढण्यासाठी शेताच्या कुंपणाच्या तारांना स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यात शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे शनिवारी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अरोली पोलिसांनी शेतमालक पोलीस पाटलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
सचिन संतोष गुरनुले (१४, रा. कोदामेंढी, ता. मौदा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव तर प्रकाश देवतळे, रा. कोदामेंढी असे अटक करण्यात आलेल्या शेतमालक पोलीस पाटलाचे नाव आहे. सचिन त्याच्या मित्रांसोबत सूर नदीच्या तीरावर खेळण्यासाठी गेला होता. त्याची कटलेली पतंग जवळच असलेल्या पोलीस पाटील प्रकाश देवतळे यांच्या शेताच्या ताराच्या कुंपणात अडकल्याने सचिन ती पतंग काढण्यासाठी गेला. त्याने कुंपणाला स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने प्रकाश देवतळे यांच्याविरुद्ध भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे काहींनी सांगितले. सचिन कोदामेंढी येथील जिल्हा परिषद विद्यालयात नवव्या वर्गात शिकायचा. त्याचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्याला बहीण व भाऊ आहे. रविवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत सचिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या वडिलांची गरिबीची परिस्थिती पाहता सदर प्रकरण दडपले तर जाणार नाही ना, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Police filed complaint against Patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.