गरीब विद्यार्थ्यांसाठी कायद्याच्या शिक्षणाचा ‘प्लॅटफॉर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:30 PM2019-03-09T23:30:24+5:302019-03-09T23:34:51+5:30

विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.

'Platform' of law education for poor students | गरीब विद्यार्थ्यांसाठी कायद्याच्या शिक्षणाचा ‘प्लॅटफॉर्म’

पायल बावनकुळे-आष्टनकर

googlenewsNext
ठळक मुद्देथेट रोजगाराची संधी : विदर्भातील विधीक्षेत्रात अनोखा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘एलएलबी’ची पदवी प्राप्त केल्यानंतर पायलने लंडन येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स’मध्ये प्रवेश घेतला. ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस लॉ’ अभ्यासक्रमात जगभरातील विविध देशांतील विद्यार्थी होते. मात्र भारतीय गुणवत्ता सिद्ध करत पायलने तेथे अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तेथेच गलेलठ्ठ ‘पॅकेज’वर ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात काम करण्याची तिला संधी होती. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच तिला तरुण विद्यार्थ्यांना एक ‘रोडमॅप’ तयार करुन द्यायचा होता. त्यामुळेच भारतात परतण्याचा शेवटी निर्णय घेतला. वडील चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील मंत्री असल्याने देशातदेखील मोठ्या कंपनीत ती सहजपणे काम करु शकली असती. मात्र वडिलांच्या नावाचा उपयोग न करता पायलने स्वत:मधील कर्तृत्वाने नागपुरातच ‘केपीबी बिझनेस अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड’ या विधी ‘फर्म’ची स्थापना केली. पाच वर्षे अभ्यास करुन पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच आर्थिक मिळकत सुरू होईल याची शाश्वती नसते. अनेकदा तर मोठ्या वकीलाच्या मार्गदर्शनात कुठलेही मानधन न घेता काही वर्षे काम करावे लागते. त्यानंतर ‘प्रॅक्टिस’ सुरू होऊन जम बसायला वेळ लागतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही अनेक जण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत नाहीत. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सर्वात जास्त फरफट होते. त्यामुळेच या ‘फर्म’च्या माध्यमातून अशा गुणवंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार देण्याचा माझा मानस असल्याचे पायलने सांगितले.
विदर्भात विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले असून नागपुरात ‘सिम्बॉयसिस’ येत असल्याने विधी शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही वर्षात नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो’ आल्यामुळे जागतिक कंपन्यांची नजर नागपूरकडे आहे. ‘आयटी’ कंपन्या अगोदरपासूनच येथे आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नागपुरात ‘कॉर्पोरेट’ संस्कृती वाढीस लागेल. अशा स्थितीत विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने विचार करावा. नागपूर व विदर्भातील विधी पदवीधारकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत पायलने मांडले.
तरुणींनी पुढाकार घ्यावा
वकील झाल्यानंतर साधारणत: स्वत:ची ‘प्रॅक्टीस’ करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र विधी पदवीधारकांची ‘कॉर्पोरेट’सह विविध क्षेत्रात प्रचंड आवश्यकता आहे. मोठ्या शहरात एकच ‘फर्म’ विविध क्षेत्रातील समस्या हाताळताना दिसते. नागपुरात तशी फारशी सुरुवात झालेली नाही किंवा तसे अनुकूल वातावरण नाही. माझ्या ‘फर्म’च्या माध्यमातून मी तो पुढाकार घेतला आहे. तरुणींनी विधी क्षेत्रात झपाट्याने पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन यावेळी पायलने केले.

 

 

Web Title: 'Platform' of law education for poor students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.