नंगा पुतळ्याच्या सोशल मीडियावरील फोटोने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:44 AM2018-06-03T01:44:18+5:302018-06-03T01:44:47+5:30

गांधीबाग येथील नंगा पुतळ्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे शनिवारी एकच खळबळ उडाली. या नग्न पुतळ्याला अंडरवियर घालून व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला.

Photo on social media of the statue of Nanga Putla created sen-session | नंगा पुतळ्याच्या सोशल मीडियावरील फोटोने खळबळ

नंगा पुतळ्याच्या सोशल मीडियावरील फोटोने खळबळ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीबाग येथील नंगा पुतळ्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे शनिवारी एकच खळबळ उडाली. या नग्न पुतळ्याला अंडरवियर घालून व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला. पुतळ्याच्या फोटोशी फोटोशॉप तंत्राद्वारे छेडछाड करून अंडरवियर घातल्याचे दाखविण्यात आले व हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. इन्स्टाग्रामवरील ‘इट हॅपन्स ओन्ली इन नागपूर’च्या पेजसह व्हॉट्सअ‍ॅपवरही नंगा पुतळ्याला अंडरवियर घातलेला फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला हा फोटो पाहून अनेकजन पुतळा पाहण्यासाठी गोळा झाले होते. मात्र या पुतळ्याची बनावट अशी आहे की त्यास अंडरवियर घालता येणे शक्य नसल्याने व्हायरल झालेल्या फोटोप्रमाणे काही दिसून आले नाही. त्यामुळे फोटोशॉपने छेडछाड केल्याची बाब समोर आली.

Web Title: Photo on social media of the statue of Nanga Putla created sen-session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.