आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:01 AM2019-02-20T01:01:05+5:302019-02-20T01:02:38+5:30

भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

The petrol pump will remain closed this evening | आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार

आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार

Next
ठळक मुद्देपुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. पंपांवर दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. देशव्यापी कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सच्या आवाहनार्थ महाराष्ट्रातील पेट्रोल डीलर्स संघटना (फामपेडा) शहिदांच्या आदरांजलीमध्ये सहभागी होणार आहे. वाहनधारकांनी या कालावधीपूर्वी वा नंतर इंधन घ्यावे आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीपासून काळजी घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे. संरक्षण दलाप्रति असलेली कृतज्ञता व एकनिष्ठता दर्शविण्यासाठी पेट्रोल डीलर्सने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title: The petrol pump will remain closed this evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.