देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:47 AM2018-06-25T10:47:10+5:302018-06-25T10:49:52+5:30

पार्थ प्रतीक गोडसे हा सामान्य मुलांसारखा राज्य माध्यमिक बोर्डातून बारावी झालेला विद्यार्थी. मात्र इंजिनीअर होण्यापेक्षा सैन्यसेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या पार्थला वायुसेनेचा अधिकारी व्हायचे आहे.

Parth left Engineering for Nation | देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह

देशसेवेसाठी पार्थने सोडला अभियांत्रिकीचा मोह

Next
ठळक मुद्देपरिश्रमाने गाठला एनडीएचा टप्पावायुसेनेचा अधिकारी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहानपणी आकाशात विमान बघताना वैमानिक होण्याचे किंवा खेळताना सैनिक होण्याचे बहुतेक मुलांचे स्वप्न असते. मात्र जसजसे वय वाढते आणि जगाची ओळख होते, तसे मुलांचे स्वप्नही व्यावहारिक होऊन जाते. मग डॉक्टर, इंजिनीअर होणे अधिक फायद्याचे वाटते. पार्थने मात्र वेगळी वाट निवडली. त्याचे सैन्यसेवेत जाण्याचे स्वप्न वयासोबत अधिक दृढ होत गेले. वायुसेनेत सेवा देण्याच्या ध्येयाला मेहनतीची जोड देत पार्थने नॅशनल डिफेन्स अकॅडमी(एनडीए)ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
पार्थ प्रतीक गोडसे हा सामान्य मुलांसारखा राज्य माध्यमिक बोर्डातून बारावी झालेला विद्यार्थी. बारावीच्या परीक्षेत त्याने ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी आवश्यक सीईटी परीक्षेतही त्याने २०० पैकी १५३ गुण प्राप्त केले असून, कुठल्याही चांगल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी हे गुण पुरेसे आहेत. मात्र इंजिनीअर होण्यापेक्षा सैन्यसेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या पार्थला वायुसेनेचा अधिकारी व्हायचे आहे. याच एका ध्येयासाठी प्रयत्न करणाºया पार्थने एनडीएच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. देशभरात सैन्येसेवेच्या ध्येयाने एनडीएची परीक्षा दिलेल्या ५.५० लाख मुलांपैकी केवळ ८,००० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून, पार्थ हा त्यापैकी एक आहे.
त्याचे वडील प्रतीक गोडसे हे एका खासगी कंपनीत सेवारत आहेत व आई अंजली या गृहिणी आहेत. पार्थ त्यांचा एकुलता एक मुलगा. परिस्थिती बºयापैकी चांगलीच आहे. पार्थने वायुसेनेत जाण्याचे ध्येय बाळगले असले तरी यासाठी आवश्यक दिशा त्याला ठाऊक नव्हती. इंटरनेटवर सर्च करून त्याने याबाबत माहिती मिळविली. दहावीत त्याने एसपीआयची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र आईवडिलांनी त्यास प्रेमापोटी जाऊ दिले नाही. त्याचे ध्येय मात्र अटळ होते. त्याने अकरावीपासून परत एनडीएची तयारी सुरू केली. मात्र योग्य मार्गदर्शन करणारा कुणीच नसल्याने सप्टेंबर-२०१७ मध्ये पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. पण ही परीक्षा त्याला अभ्यासाचा पॅटर्न समजण्यासाठी फायद्याचे ठरली. यशस्वी ठरलेल्या ८,००० पैकी केवळ ४००-४५० उमेदवारांची निवड एनडीएसाठी होणार असल्याने, ही मुलाखतही यशस्वी होण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

Web Title: Parth left Engineering for Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.