घातक झिका विषाणूचा देशात उद्रेक : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:22 AM2018-12-16T00:22:51+5:302018-12-16T00:38:09+5:30

पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये चार रुग्णांची नोंद झाली होती. ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यामुळेच झिकाचा विषाणू पसरतो. प्रथमच जयपूरमध्ये झिका विषाणू डासामध्ये आढळून आला. याच डासामुळे डेंग्यू व चिकनगुनिया पसरतो. यामुळे इतर भागात हा रोग पसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘नॅशनल ब्रेन वीक’चे राष्ट्रीय समन्वयक व जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

Outbreak in the country of fatal zika virus: Chandrasekhar Meshram | घातक झिका विषाणूचा देशात उद्रेक : चंद्रशेखर मेश्राम

घातक झिका विषाणूचा देशात उद्रेक : चंद्रशेखर मेश्राम

googlenewsNext
ठळक मुद्दे १४९ रुग्णांची नोंद, यात ४० गर्भवती महिलांचा समावेशराष्ट्रीय ब्रेन सप्ताह आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये चार रुग्णांची नोंद झाली होती. ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यामुळेच झिकाचा विषाणू पसरतो. प्रथमच जयपूरमध्ये झिका विषाणू डासामध्ये आढळून आला. याच डासामुळे डेंग्यू व चिकनगुनिया पसरतो. यामुळे इतर भागात हा रोग पसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘नॅशनल ब्रेन वीक’चे राष्ट्रीय समन्वयक व जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.


इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ न्यूरालॉजीच्यावतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान देशभर राष्ट्रीय ‘ब्रेन सप्ताह’ पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मेंदूसंबंधी व मेंदू आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि मेंदू आजारांचा दर घटविणे हे या सप्ताहाचे उद्देश आहे. डॉ. मेश्राम म्हणाले, गेल्या दशकात मेंदूचे कार्य व मज्जा रोगावर अनेक संशोधन झाले. नव्या तपासण्या, नवे तंत्र, नवी औषधे, अनेक नव्या उपचार पद्धती शोधण्यात आल्यात. परंतु दुर्दैवाने अनेक रुग्ण अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत. याचे कारण समाजात अनेक गैरसमज व अज्ञान आहे. यामुळे व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे, असेही ते म्हणाले.
८० टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही
झिका विषाणू सर्वप्रथम १९४७ मध्ये रीसस जातीच्या माकडामध्ये युगांडा येथील झिघा जंगलात आढळून आला. २०१५ मध्ये दक्षिण अमेरिकन देशात या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली. एकट्या ब्राझीलमध्ये १७ लाख रुग्णांची नोंद झाली.डास चावल्यामुळे, शारीरिक संबंधामुळे आणि दूषित रक्त दिल्यामुळे हा रोग पसरतो. या रोगाचा सर्वात मोठा धोका गर्भवती महिलांना आणि गर्भातील बालकांना असतो. या विषाणुमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते. मेंदू विकसित न झालेले बाळ जन्माला येते. यालाच ‘मायक्रोसेफॅली’ असे म्हटले जाते. ब्राझील येथे २०१५-२०१६ दरम्यान ३५०० बालकांना ‘मायक्रोसेफॅली’ झाल्याचे निदर्शनास आले होते. ताप येणे, अंगावर व्रण उठणे, खाज येणे, डोके, अंगदुखी, डोळे येणे ही या रोगाची लक्षणे असतात. मात्र, विषाणू असलेल्या ८० टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

झिकावर औषधी उपलब्ध नाही

 डॉ. मेश्राम म्हणाले, झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीसाठी कोणत्याही प्रकारची औषधे किंवा हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक लससुद्धा उपलब्ध नाही. म्हणून डास चावू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. डासावर नियंत्रण आणणे हे या रोगापासून संरक्षण करण्याकरिता महत्त्वाचे आहे.

Web Title: Outbreak in the country of fatal zika virus: Chandrasekhar Meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.