बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 10:51pm

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.

आॅनलाईन लोकमत नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे. राहुल रामू जनबंधू (२०) असे आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने खटला चालविताना आरोपीला दोषारोप समजावून सांगितले नाही. त्यामुळे आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, ही बाब आरोपीचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मांडलेल्या मुद्यात तथ्य आढळून आल्यामुळे, उच्च न्यायालयाने हा खटला दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालविण्याचा व त्यावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला. त्यासाठी प्रकरणाचा रेकॉर्ड विशेष न्यायालयाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीला सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला. आरोपी अडीच वर्षांपासून कारागृहात होता. ही घटना ६ मे २०१५ रोजी खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती पिपळा डाकबंगला येथे गुरे चारीत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी विशेष न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलवरील अंतिम सुनावणीदरम्यान संबंधित त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या.

 

संबंधित

Video: अल्पवयीन मुलीवर 7 महिने बलात्कार करणाऱ्या आरोपींची कोर्टात वकिलांकडून धुलाई
नवाज शरीफ, मरियम यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीन अर्ज फेटाळला
अत्याचाराचा व्हिडीओ काढून खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोन अत्याचार करणा-यांना अटक
अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन त्या नराधमाने केला होता तिचा खून 

नागपूर कडून आणखी

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली
७० वर ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’तून वगळा
३०रुपये रोजंदारीवर घर चालते का?
१२०० किडरोग सर्वेक्षकांवर उपासमारीची वेळ

आणखी वाचा