कलावंत घडविणारा ऑर्केस्ट्राचा शोमॅन निखळला : ओ.पी.सिंग यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:51 AM2019-01-13T00:51:28+5:302019-01-13T00:53:53+5:30

सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. आज सुनील पाल या नावाला देशात कॉमेडीचे मोठे वलय प्राप्त झाले आहे. ऐहसान कुरैशी हेही त्यातीलच एक नाव. हेच नाही तर ज्युनियर शाहरुख खान म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा प्रशांत वालदे, नृत्य दिग्दर्शक संजय यादव, विजय अमीन, मालिका अभिनेत्री मिताली नाग व गीतसंगीत, अभिनय व कला क्षेत्रातील अशी असंख्य नावे आहेत ज्यांचे करिअर ओ.पी. सिंग यांनी घडविले. असे कलावंत घडविणारा मध्य भारतातील ऑर्केस्ट्राचा शोमॅन म्हणून ओळखला जाणारा ओमप्रकाश शिवकुमार ऊर्फ ओ.पी. सिंग नावाचा तारा आज हरविला. 

Orchestra's Showman not more: O.P. Singh dies | कलावंत घडविणारा ऑर्केस्ट्राचा शोमॅन निखळला : ओ.पी.सिंग यांचे निधन

कलावंत घडविणारा ऑर्केस्ट्राचा शोमॅन निखळला : ओ.पी.सिंग यांचे निधन

Next
ठळक मुद्देसुनील पाल, ऐहसान कुरैशीसह अनेकांना दिली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. आज सुनील पाल या नावाला देशात कॉमेडीचे मोठे वलय प्राप्त झाले आहे. ऐहसान कुरैशी हेही त्यातीलच एक नाव. हेच नाही तर ज्युनियर शाहरुख खान म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा प्रशांत वालदे, नृत्य दिग्दर्शक संजय यादव, विजय अमीन, मालिका अभिनेत्री मिताली नाग व गीतसंगीत, अभिनय व कला क्षेत्रातील अशी असंख्य नावे आहेत ज्यांचे करिअर ओ.पी. सिंग यांनी घडविले. असे कलावंत घडविणारा मध्य भारतातील ऑर्केस्ट्राचा शोमॅन म्हणून ओळखला जाणारा ओमप्रकाश शिवकुमार ऊर्फ ओ.पी. सिंग नावाचा तारा आज हरविला. 


मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे सर्वेसर्वा ओ.पी. यांचे शनिवारी वयाच्या ७० वर्षी निधन झाले. ओपी यांचा आॅर्केस्ट्राचा प्रवास थक्क करणारा. १९४९ मध्ये त्यावेळी सी.पी. अ‍ॅन्ड बेरार राज्यात तुमसरजवळच्या लेंडेझरी या गावी त्यांचा जन्म झाला. कुटुंब सुशिक्षित होते व त्यांनीही प्राणीशास्त्रात एमएससी केले होते. त्यामुळे त्यांनी नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा. त्यांना मात्र व्यवसाय करायचा होता. त्यासाठी गाव सोडून ते नागपूरला आले व अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली. त्यांची पत्नी मिमिक्री कलावंत होती. त्यांनी या क्षेत्रात काही करण्याचा आग्रह केला. गीतसंगीताची आवड आधीपासून होतीच. कोणतेही भांडवल नसताना १९७१ साली त्यांनी मेलोडी मेकर्स आर्केस्ट्राची सुरुवात केली. स्टेज शोद्वारे त्यांचे कार्यक्रम सुरू झाले आणि अल्पावधीतच मेलोडी मेकर्स आणि ओ.पी. सिंग हे नाव मध्य भारतात गाजू लागले. त्यावेळी एम.ए. कादर या दिग्गज कलावंताच्या ऑर्केस्ट्राचा दबदबा होता. मात्र ओपी यांनीही आपले स्थान निर्माण केले. चित्रपटाशिवाय मनोरंजनाचे साधन नसल्याने या ऑर्केस्ट्रांनी रसिकांमध्ये धूम केली होती. त्यांच्या तारखा मिळणेही मुश्किल व्हायचे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात हजारो कार्यक्रम त्यांनी गाजवले.
ऑर्केस्ट्रा जगतात सर्वात मोठी उणीव भासली ती व्यावसायिक बांधणीची. इतर व्यवसाय जसे ऑर्गनाईज्ड असतात तसे नागपुरातील ऑर्केस्ट्रा संच हे सुव्यवस्थित नव्हते. घरात, दुकानात, मैदानात अगदी कुठेही ऑर्केस्ट्राचा सराव व्हायचा.
नागपुरात ऑर्केस्ट्राचे पाहिले अधिकृत आॅफिस, अत्याधुनिक प्रॅक्टीस रूम, आधुनिक ध्वनिव्यवस्था, प्रकाशव्यवस्थेसह बर्डी येथील नेताजी मार्केट येथे ओ.पी.सिंग यांनी केले. मेलोडी मेकर्सने साडेचार दशकात अनेक नवीन कलावंतांना मंच दिला. शहरातील ७० टक्के गायक-वादक, ध्वनी संयोजक, प्रकाश संयोजक, मिमिक्री आर्टिस्ट, नृत्यांगना अशा कलावंतांना मेलोडी मेकर्सने घडविले. लाईट, साऊंड, नृत्य, प्रोजेक्टर यांचा प्रभाव श्रोत्यांना भारावून टाकायचा. त्यामुळे त्यांना आर्केस्ट्राचे शोमॅन म्हणून ओळख प्राप्त झाली. ते स्वत: मिमिक्री आर्टिस्ट होते. नागपूर महापालिकेच्या पहिल्या ‘नागपूर महोत्सवा’ची विशेष जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली होती. ओ.पी.सिंग यांनी नर्गिस, आशा पारेख, राजेंद्र कुमार, अमिताभ बच्चन, हेलन आदी दिग्गज कालावंतांसोबत कार्यक्रम केले. ते राजपूत चेतना मंचसह महापालिका बाजार असोसिएशन व नेताजी मार्केट संघाचे अध्यक्षही होते. या कलावंताने शनिवारी एक्झिट घेऊन सर्वांनाच धक्का दिला. गेल्या काही महिन्यांपासून ते लिव्हर सिरॉसिसमुळे आजारी होते. गेल्या सहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नागपुरातील समस्त कलाजगतमध्ये त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या जोशीवाडी, सीताबर्डी येथील निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

 

Web Title: Orchestra's Showman not more: O.P. Singh dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर