विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, सिडको भूखंड घोटाळ्यावर चर्चेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 12:14 PM2018-07-05T12:14:10+5:302018-07-05T12:20:54+5:30

पावसाळी आधिवेशनच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्याजमीन घोटाळ्यावर चर्चेची मागणी केली.

Opposition ruckus in the assembly, discussions on chief minister's land scam | विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, सिडको भूखंड घोटाळ्यावर चर्चेची मागणी 

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, सिडको भूखंड घोटाळ्यावर चर्चेची मागणी 

Next

नागपूर : पावसाळी आधिवेशनच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सिडको भूखंड घोटाळ्यावर चर्चेची मागणी केली. सभागृहात प्रवेश करताना विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. तसेच सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही एक सुरात प्रश्नोत्तराचा तास रद्द करून सिडकोच्या जमीन घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. विरोधकांच्या या रणनीतीवरून स्पष्ट होते हे अधिवेशन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारसाठी अडचणीचे ठरणार आहे. 

सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री सरकराच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत, जनतेच्या दृष्ष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असून यावर बोलू देण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गोंधळाच्या वातावरणात अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा 15 मिनिटांसाठी आणि नंतर 12 वाजेपर्यंत तहकूब केले.

Web Title: Opposition ruckus in the assembly, discussions on chief minister's land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.