केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:47 PM2019-02-18T21:47:48+5:302019-02-18T21:49:24+5:30

केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.

Only Ramanam's chanting is not religion: Manmohan Vaidya | केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

Next
ठळक मुद्दे ‘आयडिया ऑफ भारत’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.
चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला संघाचे महानगर संघचालक राजेश लोया तसेच राजीव कपूर हे उपस्थित होते. धर्मकार्याहून पुण्यकार्य जास्त श्रेष्ठ आहे. समाजाला समृद्ध करणे हे धर्मकार्य आहे. धर्मामुळे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीशी जोडल्या जाऊ शकतो. भारतीयांमध्ये स्वत:च्या इतिहास, संस्कृती आणि अस्तित्वाबद्दल संभ्रम दिसून येतो. स्वत:चे वास्तव नाकारणे हीच ‘फॅशन’ झाली आहे. भारतीय मातीशी नाळ तुटली की मग त्यानंतर ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे म्हणणारी मानसिकता तयार होते. संविधानकर्त्यांच्या मनात धर्माबद्दलची संकल्पना स्पष्ट होती, मात्र आता संविधानाच्या पुरस्कर्त्यांमध्ये ती स्पष्टता जाणवत नाही. त्यामुळे खरी संकल्पना संमजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.वैद्य यांनी केले.
देशात व संपूर्ण जगात शांतता निर्माण करणे भारतीयांचीच जबाबदारी असून, हे कार्य प्रत्येकाचे आहे. भारताचे अस्तित्व जगाला सांगणे, दाखविणे आणि शिकविणे हेच आपले काम असून, त्यासाठी देशातल्या प्रत्येक तरुणाला भारत जाणून घ्यावा लागेल असेदेखील ते म्हणाले . अंकिता देशकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रेमलता डागा यांनी आभार मानले.
नेहरू यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा
आपल्या देशात भारतीय संकल्पनेवर विश्वास असणारे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा चष्मा घालून फिरणारे असा दोन विचारधारांमध्ये जुना संघर्ष आहे. पं.जवाहरलाल नेहरू हे भारतविरोधी नव्हते, मात्र त्यांच्या भारतीय संकल्पनेवर पश्चिमी विचारांचा पगडा होता, असेदेखील डॉ.वैद्य म्हणाले. यावेळी त्यांनी १९४८ साली सोमनाथ मंदिराचे जीणोद्धार व त्यासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जाण्यास नेहरू यांनी केलेला विरोध याचे उदाहरण दिले. नवीन पिढीने भारताबाबत जाणून घ्यावे, देशाला मानावे, देशासाठी बनावे आणि देशाला बनवावे असे आवाहन केले.

Web Title: Only Ramanam's chanting is not religion: Manmohan Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.