फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:57 AM2019-01-23T00:57:05+5:302019-01-23T01:00:27+5:30

केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.

Only in poster and painting 'cleanliness' ! How can Nagpur be number one? | फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वेक्षणाबाबत अधिकारी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर संवेदनशील आहेत. त्यांनी कार्यालयांचे अचानक निरीक्षण केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले. परंतु त्यानंतरही झोन कार्यालये सक्रिय नसल्याचे चित्र आहे. याचा फटका सर्वेक्षणाच्या क्रमावारीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्ष २०१७ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर १३३ व्या क्रमांकावर होते. प्रयत्नानंतर २०१८ मध्ये क्रमवारीत सुधारणा होऊ न ५५ व्या क्रमांकावर आले. घराघरातून कचरा संकलन करून भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे नेण्यात येतो. परंतु यावर समाधान मानता येणार नाही. त्यामुळेच आयुक्तांनी झोन कार्यालयांचा अचानक दौरा केला. नेहरूनगर व गांधीबाग झोनचे आरोग्य निरीक्षक यांना निलंबित केले. अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास तात्काळ निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
बॅनर व पोस्टरबाजीने भागणार नाही
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बॅनर, पोस्टर व भिंतीची रंगरंगोटी क रण्यात आली आहे. यात ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’चा संदेश देण्यात आला आहे. मात्र कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नसल्याने याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. कनक रिसोर्सेस कंपनीकडे घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी आहे. शहरालगतच्या भागात दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा उडघड्यावर टाकावा लागतो.
कचरा प्रक्रियेत मनपा माघारली
ओला व सुका कचरा वेगवेळा संकलित करण्यासाठी डस्टबिन वितरण अयशस्वी ठरले आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया होत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बायोमायनिंग प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय दुसरी प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. स्वच्छता सर्वेक्षणात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचा मुद्दा महागात पडणार असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Only in poster and painting 'cleanliness' ! How can Nagpur be number one?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.