आता पेन्शनर्स देणार बँकेला जिवंत असल्याचा ऑनलाईन पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:23 AM2019-05-19T00:23:06+5:302019-05-19T00:25:05+5:30

पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये पोर्टल सुरू करून ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही सुविधा सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.

Online proof of pensioner's bank is alive now | आता पेन्शनर्स देणार बँकेला जिवंत असल्याचा ऑनलाईन पुरावा

आता पेन्शनर्स देणार बँकेला जिवंत असल्याचा ऑनलाईन पुरावा

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारचे पोर्टल : अंगठ्याचे ठसे व आधार क्रमांक द्यावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये पोर्टल सुरू करून ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही सुविधा सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.
पेन्शनर्सने एखाद्या सायबर कॅफेमधून पोर्टलवर क्लिक करून अंगठ्याचा ठसा, आधार क्रमांक आणि बँकेचा अकाऊंट क्रमांक दिल्यानंतर त्यांच्या रजिस्टर क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल आणि बँकेला काही सेकंदातच जीवन प्रमाणपत्र सादर होईल. त्यानंतर पेन्शनर्सचे अकाऊंट अपडेट होणार आहे. ही प्रक्रिया पेन्शनर्सला दरवर्षी करावी लागणार आहे. ही सुविधा सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी सुरू केली आहे. याकरिता प्रत्येक बँकेने केंद्रीय पेन्शन प्रोसेस सेंटर (सीपीपीसी) सुरू केले आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात १६ ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे. बँक ऑफ इंडियाने नागपुरात किंग्जवे येथील मुख्य कार्यालयात ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे.
बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टलवर पेन्शनर्सला बँकेत न येता थेट विदेशातूनही लिंक करता येणार आहे. या प्रक्रियेला ई-केवायसी असे नाव दिले आहे. पेन्शनर्सला ही प्रक्रिया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पूर्ण करायची आहे. न केल्यास जानेवारीमध्ये पेन्शन बंद होणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेन्शनर्सला ओटीपी आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली असे समजायचे. त्यानंतर पेन्शनर्सच्या खात्यात महिन्याची पेन्शन जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहजरीत्या पूर्ण करता येते. प्रत्येक बँकेने पेन्शनर्ससाठी सीपीपीसी सुरू केले आहे.

Web Title: Online proof of pensioner's bank is alive now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक