एक रोहित्र- एक वीज जोडणी योजना कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:04 PM2019-05-28T22:04:11+5:302019-05-28T22:05:34+5:30

उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे.

One Rohitra-a power connection scheme implemented | एक रोहित्र- एक वीज जोडणी योजना कार्यान्वित

एक रोहित्र- एक वीज जोडणी योजना कार्यान्वित

googlenewsNext
ठळक मुद्दे एचव्हीडीएस अंतर्गत विदर्भातील २८१४ कृषीपंपांना वीज जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे.
शेतकऱ्यांना योग्य दाबाचा आणि विश्वसनीय वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त एक किंवा दोन कृषिपंपांना वीज जोडण्या दिल्या जात असल्याने विविध कारणांमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांची कायमची सुटका झाली आहे.
या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात विदर्भातील २ हजार ८१४ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून त्यासाठी २ हजार ७७१ वितरण रोहित्रांसोबतच तब्बल २ हजार ३६५ किमी लांबीची उच्चदाब वीज वाहिनीही उभारण्यात आली आहे. सोबतच ९ हजार २८२ ठिकाणी रोहित्रे उभारण्यासाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
उच्चदाब वितरण तंत्र
 सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून १० ते १५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य आहे. यात उच्च दाबाच्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादित ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य होत आहे.
नागपूर परिक्षेत्रांतर्गत एचव्हीडीएस योजनेची सद्यस्थिती
जिल्हा          कार्यान्वित रोहित्रे         वीज जोडण्या
अकोला          ३३१                         २१३
बुलढाणा        ४४५                       ४५५
वाशिम           ३१६                       ३६०
अमरावती       ९९                        १०५
यवतमाळ       ३४६                     ३७६
चंद्रपूर             १५४                     १३२
गडचिरोली      १५०                     १४२
भंडारा            २१९                     २१९
गोंदिया            २०५                   २०६
नागपूर            ३६५                    ३६६
वर्धा                 १४१                   १४१
एकूण           २७७१               २८१४

Web Title: One Rohitra-a power connection scheme implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.