नागपूर विद्यापीठातील पदवीधरांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 09:49 PM2018-03-22T21:49:45+5:302018-03-22T21:49:56+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

Number of graduates of Nagpur University decrease | नागपूर विद्यापीठातील पदवीधरांच्या संख्येत घट

नागपूर विद्यापीठातील पदवीधरांच्या संख्येत घट

Next
ठळक मुद्देशनिवारी १०५ वा दीक्षांत समारंभ राहुल बजाज, सौरभ त्रिवेदी, रचना कनोजिया, सायली पेशवे पहिल्या चार विद्यार्थ्यांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
२४ मार्च रोजी सकाळी १० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित दीक्षांत समारंभाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. दीक्षांत समारंभात २०१७ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४८३९१ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १७२ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ३१२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४५७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
मागील पाच दीक्षांत समारंभांच्या तुलनेत यंदा पदवीधरांचे प्रमाण घटले आहे. १०४ व्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची संख्या ५७२५९ इतकी होती. यंदा हीच संख्या ४८३९१ वर आली आहे. ‘पीएचडी’ प्राप्त करणाऱ्यांचा आकडा १५२ वर आला आहे. पदवीधरांची संख्या कमी होण्यासाठी विविध मुद्दे कारणीभूत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत असल्याचा हा परिणाम नसल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.

वर्षनिहाय पदवीधर
दीक्षांत समारंभ                                  पदवीधर
१००                                                   ६९,९४१
१०१                                                    ६८,७७८
१०२                                                 ७३,८७२
१०३                                                 ६४,४५९
१०४                                                 ५७,२५९
१०५                                                ४८,३९१

राहुल बजाजला २० पदके
१०५ व्या दीक्षांत समारंभातील पदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. परंतु सर्वात जास्त पदक प्राप्त करणाºयांमध्ये मुलांनी बाजी मारली आहे. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल सुनील बजाज (एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रम) याला सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर ‘सेंट्रल इंडिया कॉलेज आॅफ लॉ’चा विद्यार्थी सौरभ शरद त्रिवेदी (एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रम) याला १३ पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल. शासकीय विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी रचना प्रकाश कनोजिया (बीएसस्सी) व श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली सुरेंद्र पेशवे (बीए) या दोघींचा प्रत्येकी १२ पदके-पारितोषिकांनी सन्मान होईल.

 

Web Title: Number of graduates of Nagpur University decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.