आता ‘डेटा कॉन्सेट्रेटर युनिट’द्वारे वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:00 PM2019-06-18T19:00:26+5:302019-06-18T19:05:18+5:30

वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे. महावितरणने रेडिओ फ्रीक्वेन्सी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट(डीसीयू)द्वारे या वीजचोऱ्या पकडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात असे ३३ प्रकरण उघडकीस आले आहेत. नागपुरातही अशाप्रकारची चोरीची शंका नाकारता येत नाही.

Now through the 'Data Concentrator Unit' electric theft expose | आता ‘डेटा कॉन्सेट्रेटर युनिट’द्वारे वीजचोरी उघडकीस

आता ‘डेटा कॉन्सेट्रेटर युनिट’द्वारे वीजचोरी उघडकीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे. महावितरणने रेडिओ फ्रीक्वेन्सी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट(डीसीयू)द्वारे या वीजचोऱ्या पकडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात असे ३३ प्रकरण उघडकीस आले आहेत. नागपुरातही अशाप्रकारची चोरीची शंका नाकारता येत नाही.
रेडिओ फ्रीक्वेन्सी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट ही प्रणाली मानवविरहित असून, या प्रणालीद्वारे ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदविले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची वीजबिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. या प्रणालीद्वारे प्रत्येक ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध होत असून, दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे, ते बघता येईल. तसेच त्या भागात वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे, याची अचूक माहितीदेखील या प्रणालीमुळे मिळणार आहे. या रेडिओ फ्रीक्वेन्सी डेटा कॉन्सेट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून होणाऱ्या वीजचोरीस आळा बसण्यास मदत होणार आहे.
लातूरमध्ये ३३ ग्राहकांना पकडले
या प्रणालीद्वारे लातूर उत्तर व दक्षिण उपविभागातील ३३ ग्राहक वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी २४ हजार ९९५ युनिटची वीजचोरी केली असून, त्याची अनुमानित रक्कम २ लाख ३७ हजार ३९५ रुपये तर तडजोड रक्कम रु. १ लाख १८ हजार आहे. सदर वीज ग्राहकांविरुद्ध विद्युत अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Now through the 'Data Concentrator Unit' electric theft expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.