आता स्वस्त औषधांसाठी ‘अमृत आऊटलेट फार्मसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:32 AM2017-12-31T00:32:11+5:302017-12-31T00:37:55+5:30

नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या औषध दुकानातून विशेषत: कर्करोग व हृदयरोगांवरील औषधे बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे.

Now 'Amrit Outlet Pharmacy' for cheap medicines | आता स्वस्त औषधांसाठी ‘अमृत आऊटलेट फार्मसी’

आता स्वस्त औषधांसाठी ‘अमृत आऊटलेट फार्मसी’

Next
ठळक मुद्देकर्करोग व हृदयरोगावरील औषधे मिळणार कमी दरातनागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळच्या मेडिकलची निवड

आॅनलाईन लोकमत
नागपूर: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या औषध दुकानातून विशेषत: कर्करोग व हृदयरोगांवरील औषधे बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे.
भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात मुखाच्या कॅन्सरमध्ये नागपूर अव्वल स्थानी आहे तर ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ मध्ये विदर्भ राजधानी बनत आहे. याचे प्रमाण ४० टक्क्यांवर गेले आहे. कर्करोगासोबतच अयोग्य जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत येणाºया बहुसंख्य मेडिकलमध्ये या दोन्ही आजारांवर उपचार होतात. परंतु या योजनेसाठी नागपूरमधील दोन तर यवतमाळ व चंद्रपूर येथील एक-एक मेडिकलची निवड करण्यात आली. या चारही मेडिकलमध्ये आता ‘अमृत आऊटलेट फार्मसी’ ही योजना सुरू होत आहे. या योजनेंतर्गत ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनी’द्वारे कर्करोगाच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणारी १८६ औषधांसह १४८ इतर औषधे बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या केंद्र शासन अंगिकृत कंपनीची देशभरात अमृत आऊटलेट फार्मसी उघडण्यासाठी समन्वय अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या चारही मेडिकलमध्ये अमृत आऊटलेट फार्मसी सुरू करण्याच्या अनुषंगाने ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास व या करारावर स्वाक्षरी करण्यास संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना परवानगी देण्यात आली आहे. तसे पत्र शनिवारी प्राप्त झाले आहे.

Web Title: Now 'Amrit Outlet Pharmacy' for cheap medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.