कुख्यात गुन्हेगारावरील गोळीबार प्रकरण : पैशाचा वादावरून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:20 AM2019-07-04T00:20:58+5:302019-07-04T00:21:45+5:30

: पैशाच्या वादातून कुख्यात गुन्हेगार नदीम शेख ऊर्फ लकी खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत तो थोडक्यात बचावला. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे मानकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

Notorious criminal firing case: Attack on money dispute | कुख्यात गुन्हेगारावरील गोळीबार प्रकरण : पैशाचा वादावरून हल्ला

कुख्यात गुन्हेगारावरील गोळीबार प्रकरण : पैशाचा वादावरून हल्ला

Next
ठळक मुद्देनागपुरातील मानकापुरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैशाच्या वादातून कुख्यात गुन्हेगार नदीम शेख ऊर्फ लकी खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत तो थोडक्यात बचावला. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे मानकापूर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी सोहेल, धरम ठाकूर, राजेश, नब्बू, अकील, गुलाम आरीफ व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष साहूच्या खुनाच्या प्रकरणात लकी खानला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्याला तुुरुंगातून बाहेर काढण्यासाठी धरम ठाकूरने त्याची पत्नी व वकिलाला तीन लाख रुपयाची मदत केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पैसे परत करणार होता. या प्रकरणात लकी खाना दोषी ठरवित शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगात होता. दरम्यान तो जामिनावर बाहेर आला. मंगळवारी रात्री ११.३० वाजता तो गिरीश थडानी व त्याचा जावई फारुख शेख याच्यासह कारमध्ये कोराडीकडे जात होता. मानकापूर परिसरातील कल्पना सिनेमागृहाजवळ एका कारने त्यांना रोखले. मागून काही युवक बाईकने आले. कार चालक थडानी खाली उतरला. तसेच समोर उभी कार व बाईकच्या दिशेकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे थडानी पळून गेला. एक गोळी लकीच्या हातावर लागली. गोळीबार करणारे पळून गेले.
घटनेची सूचना मिळताच मानकापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचनामा केला असता घटनास्थळी दोन गोळ्या सापडल्या. यात तीन ते चार राऊंड गोळीबार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. धरम ठाकूर हा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे.

Web Title: Notorious criminal firing case: Attack on money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.