विद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:59 AM2018-06-23T00:59:31+5:302018-06-23T01:01:41+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थी प्रवेशबंदी प्रकरणामध्ये शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २७ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

Notice to the University of Nagpur on student admission | विद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस

विद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस

Next
ठळक मुद्देहायकोर्ट : बुधवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थी प्रवेशबंदी प्रकरणामध्ये शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २७ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
विद्यार्थी प्रवेशबंदीच्या वादग्रस्त आदेशाला अरुण जोशी शिक्षण महाविद्यालयाने आव्हान दिले आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशनने या महाविद्यालयाला एका तुकडीत ५० या प्रमाणे वार्षिक १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मान्यता ३१ मे २०१५ रोजी दिली. आतापर्यंत यानुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते. विद्यापीठ विद्यार्थ्यांची परीक्षा घेत होते व इतर आवश्यक प्रक्रियाही पूर्ण करीत होते. कौन्सिलने गेल्या जानेवारीमध्ये या महाविद्यालयाला परत एका तुकडीत ५० या प्रमाणे वार्षिक १०० विद्यार्थी प्रवेशाची मान्यता दिली. असे असताना विद्यापीठाने वार्षिक २०० विद्यार्थी प्रवेश क्षमता गृहित धरून त्यानुसार आवश्यक शिक्षक व सुविधा नसल्याच्या कारणावरून या महाविद्यालयाला २०१८-१९ वर्षासाठी संलग्नीकरण नाकारले आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई केली. यासंदर्भात गेल्या १२ जून रोजी आदेश जारी करण्यात आला. त्यावर महाविद्यालयाचा आक्षेप आहे. महाविद्यालयातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

Web Title: Notice to the University of Nagpur on student admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.