आग नियंत्रण व्यवस्था नसलेल्या नागपुरातील ६०० प्रतिष्ठानांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 08:34 PM2019-06-17T20:34:06+5:302019-06-17T20:35:13+5:30

गुजरातमध्ये काही दिवसाांपूर्वीची दुर्घटना लक्षात घेता, नागपूर शहरात अशा स्वरूपाची घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाातर्फे शहरातील बहुमजली इमारतींमधील ट्युशन क्लासेस व हॉटेल्स, मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. आग नियंत्रण यंत्रणा नसलेल्या ६०० प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आली. तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी दिली.

Notice to 600 establishments not having fire control system | आग नियंत्रण व्यवस्था नसलेल्या नागपुरातील ६०० प्रतिष्ठानांना नोटीस

आग नियंत्रण व्यवस्था नसलेल्या नागपुरातील ६०० प्रतिष्ठानांना नोटीस

Next
ठळक मुद्देलहुकुमार बेहते : लवकरच हॅड्रोलिक प्लेटफार्म खरेदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुजरातमध्ये काही दिवसाांपूर्वीची दुर्घटना लक्षात घेता, नागपूर शहरात अशा स्वरूपाची घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाातर्फे शहरातील बहुमजली इमारतींमधील ट्युशन क्लासेस व हॉटेल्स, मॉल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. आग नियंत्रण यंत्रणा नसलेल्या ६०० प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आली. तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी दिली.
शहराचा विकास होत असल्याने बहुमजली इमारती, मॉल्स, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, मिहान यासह उद्योग अस्तित्वात आले. यादृष्टीने अग्निशमन विभागाला बळकट करण्यासाठी ४२ मीटर उंचीच्या टर्न टेबल लेंडर खरेदी केले. यात बिघाड निर्माण झाल्यास पर्याय म्हणून ३२ मीटर उंचीची हॅड्रोलिक प्लेटफार्म मशीन खरेदी करणार आहे. वाठोडा परिसरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांसाठी ४० निवासी गाळ्यांचे बांधकाम सुरू आल्याची माहिती बेहते यांनी दिली.
शहरातील अरुंद रस्ते असलेल्या वस्तीत आग लागल्यास नियंत्रणासाठी ४ फायर टेंडर खरेदी करण्यात आले. दोन वॉटर बाऊझर खरेदी करण्यात आले. अग्निशमन विभागाला बळकट करण्यासाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. लकडगंज केंद्राच्या पुनर्बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. तसेच मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याची माहिती लहुकुमार बेहते यांनी दिली.

Web Title: Notice to 600 establishments not having fire control system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.