हतबल नव्हे मजबुत पंतप्रधान हवा : भुपेंद्र यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:07 PM2019-01-18T23:07:41+5:302019-01-18T23:13:04+5:30

भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Not helpless but wants strong prime minister: Bhupendra Yadav | हतबल नव्हे मजबुत पंतप्रधान हवा : भुपेंद्र यादव

हतबल नव्हे मजबुत पंतप्रधान हवा : भुपेंद्र यादव

Next
ठळक मुद्देकॉंग्रेसला भ्रष्टाचाराची जननी असल्याचे सुतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भुपेंद्र यादव बोलत होते. ते म्हणाले, भाजपा मोदी सरकारने केलेली कामे घेऊन नागरिकांमध्ये जाणार आहे. मोदींच्या आधी युपीएच्या काळातील पंतप्रधान हतबल होते. ते केवळ एका परिवाराच्या हिताकडे लक्ष ठेवत होते. परंतु मोदी देशातील जनतेला परिवार समजून काम करीत आहेत. कॉंग्रेसवर हल्ला करताना ते म्हणाले, कॉंग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. बँकात ५२ लाख कोटींच्या कर्ज खात्यांचे एनपीए होणे त्यांचीच देन आहे. या बाबत कायदा करण्याची मागणी मोदी शासनाने २०१६ मध्ये पूर्ण केली. त्याच्या बळावर नीरव मोदी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांवर पाश आवळले जात आहेत. ते म्हणाले, कॉंग्रेस केवळ खोटे बोलते. राफेल विमानाच्या सौद्यावरही कॉंग्रेस खोटे बोलत आहे. सुप्रिम कोर्टाने कोणतीच गडबड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस संविधानिक संस्थांना विरोध दर्शवून लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत आहे. त्यांचे राज्य सीबीआयचे अधिकार क्षेत्र हिसकावून घेत आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीवर कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी कॉंग्रेसशी निगडीत वकील या मुद्याला सुप्रिम कोर्टात अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
महाआघाडीत कोण राहतील माहित नाही
यादव यांनी भाजपाच्या विरोधात होत असलेली महाआघाडी तथ्यहिन असल्याचे सांगत त्यात कोण-कोणासोबत आहे याची माहितीच होत नसल्याचे सांगतले. ते म्हणाले, केरळात कॉंग्रेस डाव्या आघाडी विरोधात लढते, परंतु बंगालमध्ये त्यांच्यासोबत आघाडी करते. उत्तर प्रदेशात सपा-बसपाने कॉंग्रेसला बाहेर केले आहे. त्यांच्याकडे कोणतेच नेतृत्व नाही. ते मजबुत शासन देऊ शकत नाहीत.
शिवसेना वैचारिक सहकारी
महाराष्ट्रात शिवसेनेशी युतीबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना भाजपाचा जुना सहकारी आहे. आमच्यात वैचारिक एकता आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत लहान-मोठे ३५ पक्ष सोबत आहेत.

Web Title: Not helpless but wants strong prime minister: Bhupendra Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.