उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:56 PM2018-05-21T23:56:24+5:302018-05-21T23:56:38+5:30

पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.

North Nagpur Vaishaliagar firing a youth wounded | उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी

उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी

Next
ठळक मुद्देमोटरसायकलवर आलेल्या दोघांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.
कपिल कुलदीप तुराटे (३२) रा. जोशीवाडी, पाचपावली असे जखमीचे नाव आहे. कपिल फिश फ्रायचा ठेला लावतो. सूत्रानुसार रात्री १० वाजता बाईकवर आलेल्या दोन युवकांनी कपिलवर गोळीबार गेला. परंतु त्यांचा निशाणा चुकल्याने गोळी कपिलच्या हाताला लागली. गोळी चालल्याचा आवाज ऐकताच परिसरात खळबळ उडाली. काही लोकांनी पोलिसांना सूचना दिली. पाचपावली व यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कपिलला लगेच पाचपावलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार कपिलचा काही युवकांशी वाद सुरू आहे. या वादातूनच गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. पाचपावली आणि गुन्हे शाखा पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयास्पद युवकांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: North Nagpur Vaishaliagar firing a youth wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.