विना शस्त्रक्रिया हृदयाचे वॉल्व बदलविणे शक्य : अमेरिकेचे हृदय रोग तज्ज्ञ जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:38 PM2019-01-11T23:38:29+5:302019-01-11T23:44:27+5:30

मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (टीसीव्हीआर) तंत्रज्ञानामुळे विना शस्त्रक्रिया ‘वॉल्व’ला बदलविल्या जाऊ शकते आणि रुग्ण केवळ एक दिवसातच सामान्य जीवन जगू शकतो. सध्या हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या न्यूयार्क शहरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. भारतात निवडक ठिकाणी याची सुरूवात झाली आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉ. शरद सी. जेटली यांनी ‘लोकमत’ला दिली.

Non-surgery can be changed heart valve: American heart disease expert Jaitley | विना शस्त्रक्रिया हृदयाचे वॉल्व बदलविणे शक्य : अमेरिकेचे हृदय रोग तज्ज्ञ जेटली

विना शस्त्रक्रिया हृदयाचे वॉल्व बदलविणे शक्य : अमेरिकेचे हृदय रोग तज्ज्ञ जेटली

googlenewsNext
ठळक मुद्दे‘टीसीव्हीआर’ तंत्र प्रभावी, आता ‘ओपन हार्ट सर्जरी’ची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (टीसीव्हीआर) तंत्रज्ञानामुळे विना शस्त्रक्रिया ‘वॉल्व’ला बदलविल्या जाऊ शकते आणि रुग्ण केवळ एक दिवसातच सामान्य जीवन जगू शकतो. सध्या हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या न्यूयार्क शहरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. भारतात निवडक ठिकाणी याची सुरूवात झाली आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉ. शरद सी. जेटली यांनी ‘लोकमत’ला दिली.
डॉ. जेटली यांनी १९७७ मध्ये नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. फेलोशिपसाठी ते अमेरिकेला गेले. कार्डिओलॉजीमध्ये तीन फेलोशिप करून त्यांनी तीन दशकांपर्यंत अमेरिकेच्या विद्यापीठात शिकविले. अल्बर्ट आइन्स्टाइन, माउन्ट साईनाई आणि न्यूयार्क मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले डॉ. जेटली म्हणाले, हृदयरोग उपचारात अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. यातील एक म्हणजे ‘टीसीव्हीआर’ तंत्रज्ञान प्रभावशाली ठरले आहे. हाताच्या किंवा पायाच्या धमनीमधून कृत्रिम ‘वॉल्व’ला हृदयात बसविले जाते. भारतात मोजक्याच ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले जाते. नागपुरात हृदयरोगाच्या उपचारात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
‘अ‍ॅसिडीटी’समजून दुर्लक्ष करू नये
डॉ. जेटली म्हणाले, काही लोकं छातीत जळजळ होतेय, ‘अ‍ॅसिडीटी’ असेल असे समजून दुर्लक्ष करतात. काही लोकं उपचार टाळतात. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. ही लक्षणे हृदय विकाराच्या झटक्याची असू शकतात. यामुळे छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही डॉ. जेटली यांनी दिला.
जिथे सोयी, तिथेच उपचार
डॉ. जेटली म्हणाले, जिथे हृदयरोगावर उपचाराची सोय आहे तिथेच उपचार घ्यावा. हृदय विकाराचा झटका आल्यावर तातडीने उपचार घेतल्यास धोका टळतो. म्हणून या रोगाबाबत माहिती व जागरुक असणे आवश्यक आहे. एका हृदय विकाराच्या झटक्याला पूर्ण होण्यास चार तास लागतात. म्हणजेच, हृदयामध्ये ‘क्लॉट ब्लस्टर’ची प्रक्रिया पूर्ण व्हायला चार तास लागतात. हृदय विकाराच्या झटक्यानंतरही २४ तासापर्यंत काही रुग्ण जीवंत राहू शकतात.
पायावरील सूज, चक्कर याकडे दुर्लक्ष नको
जर कुण्या व्यक्तीला छातीत दुखत असेल, नेहमीच पायावर सूज राहत असेल, चक्कर येत असेल, श्वास लागण्याची समस्या असले तर याकडे दुर्लक्ष करू नये. हे हृदयरोगाची लक्षणे असू शकतात. डॉ. जेटली म्हणाले, अशा रुग्णांची तातडीने ‘ईसीजी’ व आवश्यक तपासणी करणे आवश्यक ठरते. आजाराला दूर ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करा, ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य द्या, हे हृदयाला मजबूत बनविते.
‘मुनिमीटर’मधून रुग्णांची जनजागृती
३० ते ३५ वर्षापर्यंत वैद्यकीय शिक्षण दिल्यानंतर लोकांना जागरुक करण्याचे कार्य डॉ. जेटली यांनी हाती घेतले आहे. यासाठी त्यांना त्यांचा मुलगा मुनि एस. जेटली मदत करीत आहे. कोलंबिया बिजनेस शाळेतून मुनि ‘एमबीए’ करीत असून ‘मुनिमीटर हेल्थ डॉट कॉम’चा तो ‘सीईओ’ आहे. रुग्णांना शिक्षीत करण्यासाठी कॉर्डिओलॉजीवर आधारित ५०० पेक्षा अधिक व्हिडीओ डॉ. शरद जेटली यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत तयार करून ‘यूट्यूब’वर टाकले आहे. जगातील ८० देशांतील लोक ‘मुनिमीटर’चे अनुसरण करतात. १.५० लाख मिनीट्सपेक्षा अधिकवेळा हे व्हिडीओ पाहण्यात आले आहेत. डॉ. जेटली म्हणाले, या कार्यासाठी मुलगा मुनिने एक सेटअप तयार करून दिला आहे. यात व्हिडीओ बनवून अपलोड करतो. रोज ३६वर प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तरही देतो. रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही वेबसाइट प्रभावी ठरली आहे. वेबसाईटचे एक हजारापेक्षा जास्त ‘सब्सक्राइबर’ आहेत.

Web Title: Non-surgery can be changed heart valve: American heart disease expert Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.