नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये : प्रा. राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:30 PM2017-12-13T23:30:03+5:302017-12-13T23:32:23+5:30

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता (नॉन क्रिमिलेअर) उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

Non Crimilare Income limit increased Rs. 8 lakhs from six lakhs: Pro. Ram Shinde | नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये : प्रा. राम शिंदे

नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये : प्रा. राम शिंदे

Next
ठळक मुद्देविजा, भज, इमाव, विशेष मागास प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

 

आॅनलाईन लोकमत
नागपूर : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता (नॉन क्रिमिलेअर) उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
केंद्र्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारने २४ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार कुटुंबाची मर्यादा ४.५० लाख वरून ६ लाख केलेली होती. केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये ही उत्पन्नाची मयार्दा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये केली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाने ही मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.
राज्य शासनाने राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधीसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षण अधिनियम, २००१ (२००४चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत.

 

 

Web Title: Non Crimilare Income limit increased Rs. 8 lakhs from six lakhs: Pro. Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.