नागपुरात एकाही खुल्या रेस्टारंटकडे परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:51 PM2018-02-17T23:51:56+5:302018-02-17T23:53:00+5:30

मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत अग्निशमन विभागाने अशा खुल्या रेस्टॉरंटला नोटीस बजावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहे.

No permission to any open restaurant in Nagpur |  नागपुरात एकाही खुल्या रेस्टारंटकडे परवानगी नाही

 नागपुरात एकाही खुल्या रेस्टारंटकडे परवानगी नाही

Next
ठळक मुद्देअग्निशमन विभागाकडून दखल : नोटीस बजावल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत अग्निशमन विभागाने अशा खुल्या रेस्टॉरंटला नोटीस बजावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहे.
नागपूर शहरात ४७२ हॉटेल व रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन विभागाची परवानगी न घेता यातील नऊ ठिकाणी टेरेसवर खुल्या जागेवर शेड उभारून रेस्टॉरंट सुरू केले आहे. २०१५ मध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात रेस्टॉरंट वा बार सुरू करताना अग्निशमन विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर परवानी घेण्याची पद्धत बंद झाली. परंतु मुंबई येथील घटनेनंतर राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रेस्टॉरंट, बार व हॉटेल अशा ठिकाणी आग नियंत्रण यंत्रणा उपलब्ध आहे की नाही. याबाबत अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही व्यवस्था नसलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट चालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. ही जबाबदारी कळमना अग्निशमन केंद्राचे बी.पी.चंदनखेडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी अनेक रेस्टॉरंट व हॉटेलची पाहणी केली. यात परवानगी न घेता टेरेसवर सुरु करण्यात आलेले रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर कारवाईला गती आली आहे.

Web Title: No permission to any open restaurant in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.