उपचारात हलगर्जीपणा, २० लाख रुपये भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:18 PM2019-04-20T22:18:27+5:302019-04-20T22:22:15+5:30

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर सर्किट बेंचने वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत वोक्हार्ट हॉस्पिटलला भरपाई म्हणून नऊ टक्के व्याज दराने २० लाख रुपये व तक्रारीच्या खर्चाच्या रुपात २० हजार रुपये अनिल गुप्ता यांना देण्याचे आदेश दिले.

Negligence in treatment, Rs 20 lakh compensation order | उपचारात हलगर्जीपणा, २० लाख रुपये भरपाईचे आदेश

उपचारात हलगर्जीपणा, २० लाख रुपये भरपाईचे आदेश

Next
ठळक मुद्देवोक्हार्ट हॉस्पिटलला राज्य ग्राहक आयोगाचा झटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर सर्किट बेंचने वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत वोक्हार्ट हॉस्पिटलला भरपाई म्हणून नऊ टक्के व्याज दराने २० लाख रुपये व तक्रारीच्या खर्चाच्या रुपात २० हजार रुपये अनिल गुप्ता यांना देण्याचे आदेश दिले.
तक्रारीनुसार, गुप्ता यांचा पत्नी ममता गुप्ता यांचा मृत्यू १२ डिसेंबर २०११ रोजी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांनी पत्नीला २ ऑगस्ट २०११ रोजी डोकेदुखीला घेऊन तपासणी व उपचारासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. सीटी स्कॅनमध्ये त्या हायड्रोसिफलसने पिडीत असल्याचे सामोर आले. त्यानंतर डॉ. शैलेश केळकर यांनी ११ ऑगस्ट २०११ रोजी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ममता गुप्ता यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना ४ सप्टेंबर २०११ रोजी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात येणार होती. त्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ३ सप्टेंबरला सीटी स्कॅनला पाठविण्यात आले. त्यांना खाटेवर ठेवताना हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या खाली पडल्या. हा आरोप लावण्यात आला आहे की, रुग्णाला खाटेवर ठेवताना निष्काळजीपणा झाला.
रुग्णाला खाटेवर ठेवताना व तपासणी दरम्यान एकच नर्स उपस्थित होती. नर्सिंगचा अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे रुग्णांचा सांभाळकरतानाच्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. आरोपानुसार, रुग्णाच्या देखभालीसाठी नियुक्त कर्मचारी हे अनुभवी व पात्र नव्हते. रुग्ण खाली पडल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. अनेकवेळा विनंती केल्यानंतरही रात्री उशीरापर्यंत विशेषज्ञ डॉक्टर आले नाहीत. सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यात आले नाही. रुग्ण पडल्यामुळे अंतर्गत दुखापत झाली. ज्यामुळे मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते.
तक्रारकर्त्याकडून युक्तीवाद करताना अ‍ॅड. तुषार मंडलेकर म्हणाले की, इस्पितळाच्या हलगर्जीपणामुळेच ममता जखमी झाल्या. मेंदूमध्ये रक्त जमा झाल्यानंतरही हॉस्पिटलकडून योग्य उपचार मिळाला नाही. तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली नाही. २१ सप्टेंबर २०११ रोजी रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेषज्ञ डॉक्टर ममता यांना वाचविण्यास अयशस्वी राहिले. १२ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
हॉस्पिटलकडून युक्तीवाद करण्यात आला की, रुग्ण कॅन्सर पिडीत होती. उपचार सुरू होता. त्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. यावर अ‍ॅड. मंडलेकर यांनी हॉस्पिटलच्या औषधांची माहिती देवून ते चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांनी, हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच ममता यांचा मृत्यू झाल्याचे मांडले. दोन्ही पक्षाला ऐकून घेतल्यानंतर आयोगाने आपला निर्णय दिला.

Web Title: Negligence in treatment, Rs 20 lakh compensation order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.