ठळक मुद्देपेट्रोल, गॅसची दरवाढ थांबवा : संविधान चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातत्याने वाढत असलेले पेट्रोल, डिझेलचे दर व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी संविधान चौकात निदर्शने केली. केंद्र सरकारने ही दरवाढ थांबविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्त्वात प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने पेट्रोलचे दर दररोज निश्चित करण्याच्या नावावर भरमसाठ वाढ करून नागरिकांची फसवणूक केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमतही वाढविण्यात आली असून मार्चनंतर गॅससाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याचा बेत आखला आहे. महागाई वाढविणारी धोरणे राबवून मोदी सरकार गरिरबांसाठी अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.
आंदोलनात दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, योगेश कुंभलकर, चरणजित चौधरी,बजरंग परिहार, सुखदेव वंजारी, महेंद्र भांगे, विशाल खांडेकर, शैलेंद्र तिवारी, सतीश इटकेलवर, नूतन रेवतकर, अलका कांबळे, वर्षा शामकुळे, बबिता मेहर, लक्ष्मी सावरकर, उषा चौधरी, ज्योती लिगायत,उर्वशी गिरडकर, साधना श्रीवास्तव, ज्योती खोब्रागडे, अर्चना वायू, इंदू फुलझेले, सुरेश करणे, साहेबराव चौधरी,महादेव फुके, रिजवान अन्सारी, कादिर शेख, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर,अशोक काटले, अशोक आदीकने, देवानंद रडके,हेमंत भोतमांगे, प्रभूदास तायवाडे आदींनी भाग घेतला.