नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:48 AM2018-10-16T10:48:56+5:302018-10-16T10:49:44+5:30

सध्या नवरात्रीच्या उत्साही पर्वात गरबा नृत्याचे आकर्षण तरुणाईला नसले तरच नवल.. या नवलाईपासून गे तरुणाईही दूर राहिलेली नाही.

Navratri 2018 Special; The joy of Garba in Nagpur is the first time the young man looted | नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद

नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद

Next
ठळक मुद्देनागरिकांनीही केले कौतुक व औत्सुक्याने स्वागत

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सध्या नवरात्रीच्या उत्साही पर्वात गरबा नृत्याचे आकर्षण तरुणाईला नसले तरच नवल.. या नवलाईपासून गे तरुणाईही दूर राहिलेली नाही. अलिकडेच ३७७ कलम रद्द झाल्याने सार्वजनिक स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेणाऱ्या या मंडळीने गरबा नृत्यात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित केला. विशेष म्हणजे, अशा प्रकारे सार्वजनिकरित्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भारतीय नागरिकाच्या नात्याने सहभागी होण्याचा हा गे पंथियांचा पहिलाच प्रसंग होता.
नागपुरात एके ठिकाणी सुरू असलेल्या गरबा नृत्य सोहळ््यात सुमारे १२-१३ गे तरुणांनी नृत्य केले. या ठिकाणी जाण्याआधी त्यांच्या मनात थोडी धाकधूक होती. आयोजकांपैकी कुणी जर आपल्याला हटकले तर काय.. असा प्रश्नही होता. मात्र, कुणी हटकलेच तर आपण तिथून निघून जाऊ असे ठरवून हे तरुण गरबास्थळी पोहचले. पारंपारिक वेष परिधान केलेले व चेहºयावर जरा हटके मेकअप असलेल्या या तरुणांकडे सगळ््यांचेच लक्ष जात होते. त्यांच्या नृत्यकौशल्याने तर सगळ््यांच्याच डोळ््याचे पारणे फेडले. या ठिकाणी त्यांना पहाण्यासाठी नंतर बरीच गर्दी जमा झाली होती. गे समुदाय हा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात आला आहे, हा संदेश जनमानसात पोहचावा यासाठी आम्ही प्रथमच अशा सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी जाण्याचे धाडस केल्याचे या मंडळीचे म्हणणे होते.
 

Web Title: Navratri 2018 Special; The joy of Garba in Nagpur is the first time the young man looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.