कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारांसह शिक्षकांचीही नावे; सरकारची फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:50 AM2017-12-16T10:50:47+5:302017-12-16T10:53:27+5:30

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली.

The names of teachers, including MLAs, for remittance benefits; Government False | कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारांसह शिक्षकांचीही नावे; सरकारची फजिती

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारांसह शिक्षकांचीही नावे; सरकारची फजिती

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेच्या आमदाराचा विधानसभेत खुलासाआयटी विभागाचा घोळ असल्याचे स्पष्टीकरणविद्यार्थिनीला मिळाला लाभ

आॅनलाईन लोकमत
नागपूर : कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली.
उल्लेखनीय म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्जमाफीचे आकडे जाहीर केले. त्यांच्यानुसार राज्यात आतापर्यंत ६९ लाख खातेधारकांपैकी ४३ लाख खातेधारकांना २० हजार ७३४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. शुक्रवारी आबीटकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत सांगितले की, कोल्हापूर येथील त्यांच्या सोसायटीच्या अध्यक्षांनी आज सकाळी फोनवर माहिती दिली, की त्यांचे नाव लाभार्थीच्या यादीमध्ये आहे. त्यांच्या खात्यात २५ हजार रुपये जमा झाले आहेत.
दरम्यान आ. आबीटकर यांनी सभागृहाबाहेरही पत्रकारांशी बोलताना हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून यादी पाठवली जाते. यात माझे नाव कसे आले? मलाच माहिती नाही. आयटी विभागाने हा सर्व घोळ केला आहे. माझ्या ओळखीच्या चार शिक्षकांचाही या यादीत समावेश आहे. त्यांची यादीही त्यांनी दाखवली. त्यांचा या यादीशी काहीही संबंध नाही. असे हजारो लाभार्थीया यादीत असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेना याचा पाठपुरावा करीत आहे. परंतु असा घोळ होत असेल तर खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


सरकारची फजिती
सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीज शुक्रवारी सरकारची फजिती केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा शिवसेना ‘बॅकफूट’वर आली. पक्षाचे आमदार सुनील प्रभू हे सरकारच्या बजावासाठी पुढे आले, ते म्हणाले, प्रकाश आबीटकर या नावाचे एकापेक्षा अधिक लोकही राहू शकतात. आबीटकर यांनी ही माहिती केवळ सरकारला सचेत करण्यासाठी दिली आहे.

सुतार यांच्या संयुक्त कर्जखात्यामध्ये आबिटकर यांचे नाव
आमदार प्रकाश आबिटकर यांचे कर्जखाते कर्जमाफीतील २५,००० रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली आहे. आ. प्रकाश आबिटकर यांचा कर्जमाफीसाठी अर्ज नाही. आबिटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. प्रकाश आबिटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे पण तो आमदार महोदयांचा नाही, ते खाते बँक आॅफ इंडियातील आहे.

मातोश्रीवर यादीची तपासणी
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही तपासण्यासाठी मातोश्रीवर जाणार की काय असे वाटत असल्याचे सांगत लाभार्थाी शेतकऱ्यांची यादी सरकारच्या वेबसाईटवर सार्वजनिक करण्याची मागणी करीत सरकारला चिमटा काढला.

१९ ला प्रमाणपत्र, ८ ला कर्जमाफी नाही
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ऐन दिवाळीमध्ये प्रमाणपत्र वाटले. बुलडाणा येथे १९ शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आले. त्यापैकी ८ शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. तसेच त्यापैकी २ शेतकऱ्यांचे नाव तर ग्रीन लिस्टमध्ये सुद्धा नाही, ही बाब काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे निदर्शनास आणली.


विद्यार्थिनीलाही मिळाला लाभ
विरोधी पक्षाकडून सादर केलेल्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, दहावीच्या एका विद्यार्थिनीच्या खात्यातही कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत.

Web Title: The names of teachers, including MLAs, for remittance benefits; Government False

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.