नागपूरकरांची संक्रांत ‘गोड’ : उत्साहाला हवेची साथ ; ‘ओ काट...’ने निनादले आसमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:10 PM2019-01-15T23:10:40+5:302019-01-15T23:11:43+5:30

एकाहून एक आकर्षक पतंगींनी व्यापलेले आसमंत, वाऱ्याशी स्पर्धा करत उंच भरारी घेताना पतंगीला मिळणारा लयबद्ध ताण, एकमेकांची पतंग कापण्यासाठी खेळीमेळीची चढाओढ, ‘डीजे’वर थिरकरणारे पाय अन् क्षणाक्षणाला घुमणारे ‘ओ काट...’चे आवाज. सोबतच गच्चीवर आणलेला गरमागरम नाश्ता, तीळगुळाचा गोडवा अन् बच्चेकंपनीच्या सुटीचा दुग्धशर्करा योग. मकरसंक्रांत म्हटली की नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण येतेच. मात्र यंदा ‘नायलॉन’च्या मांजाच्या भीतीलाच ‘ओ काट..?’ करत ‘पतंग उडी उडी जाए...’च्या तालावर नागपूरकरांनी खºया अर्थाने ‘गोड’ संक्रांत साजरी केली. मागील वर्षांच्या तुलनेत अपघात व मांजामुळे गंभीर जखमी होण्याचे प्रमाण कमी दिसून आले हे विशेष. 

Nagpur's sankrat 'sweet': with enthusiasm for air; 'O Kat ...' is Nineadele Asmant | नागपूरकरांची संक्रांत ‘गोड’ : उत्साहाला हवेची साथ ; ‘ओ काट...’ने निनादले आसमंत

नागपूरकरांची संक्रांत ‘गोड’ : उत्साहाला हवेची साथ ; ‘ओ काट...’ने निनादले आसमंत

Next
ठळक मुद्देअपघात, गंभीर जखमींचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाहून एक आकर्षक पतंगींनी व्यापलेले आसमंत, वाऱ्याशी स्पर्धा करत उंच भरारी घेताना पतंगीला मिळणारा लयबद्ध ताण, एकमेकांची पतंग कापण्यासाठी खेळीमेळीची चढाओढ, ‘डीजे’वर थिरकरणारे पाय अन् क्षणाक्षणाला घुमणारे ‘ओ काट...’चे आवाज. सोबतच गच्चीवर आणलेला गरमागरम नाश्ता, तीळगुळाचा गोडवा अन् बच्चेकंपनीच्या सुटीचा दुग्धशर्करा योग. मकरसंक्रांत म्हटली की नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण येतेच. मात्र यंदा ‘नायलॉन’च्या मांजाच्या भीतीलाच ‘ओ काट..?’ करत ‘पतंग उडी उडी जाए...’च्या तालावर नागपूरकरांनी खºया अर्थाने ‘गोड’ संक्रांत साजरी केली. मागील वर्षांच्या तुलनेत अपघात व मांजामुळे गंभीर जखमी होण्याचे प्रमाण कमी दिसून आले हे विशेष. 


सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये पतंगबाजीचा उत्साह दिसून आला. शहरातील मोकळी मैदाने, उंच इमारतींच्या गच्ची येथे गर्दी झाली होती. सकाळी काही प्रमाणात ढगदेखील होते व हवादेखील चांगली वाहत होती. त्यामुळे तर पतंग उडविण्याची चढाओढ दिसून आली. इतवारी, महाल, सक्करदरा, मानेवाडा, प्रतापनगर, गोपालनगर, रामेश्वरी परिसर, भगवाननगर, फुटाळा परिसर येथे मोठ्या प्रमाणावर पतंगबाजीचा माहोल होता. अगदी अंधार पडल्यानंतरदेखील ‘ओ काट...’चे स्वर ऐकू येत होते. 


तरुणींची आघाडी, बच्चेकंपनीचा माहोल
अनेक जणांनी गच्चीवर गाणी लावून नानाविध पदार्थांचा आस्वाद घेत कुटुंबीय व मित्रपरिवारासह पतंग उडवण्याचा आनंद घेतला. मध्य व पूर्व नागपुरात तर तरुणी व महिलादेखील पतंग उडविण्यात आघाडीवर होत्या. आजी-आजोबादेखील नातवंडांच्या हट्टापायी पतंग उडवण्यासाठी गच्चीवर आलेले दिसले. बच्चेकंपनी तर कुठलीही पतंग कापल्या गेली तरी ‘ओ काट...’च्या आरोळ््या ठोकताना दिसून आले. 


‘नायलॉन’चा प्रभाव घटला
‘नायलॉन’ मांजासंदर्भात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. ‘लोकमत’ने अवैधपणे मांजाची होणारी विक्री उघडकीस आणल्यानंतर पोलीस प्रशासनानेदेखील कडक कारवाई केली. ‘नायलॉन’ मांजा वापरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असल्यामुळे यंदा या मांजाचा प्रभाव घटला. तरीदेखील काही प्रमाणात ‘नायलॉन’ मांजाचा वापर दिसून आला. 


अतिउत्साहींनी घातला जीव धोक्यात
यंदा अपघातांची संख्या घटली असली तरी अतिउत्साही तरुणांचे प्रमाण कायम होते. अनेकांनी जीवाची पर्वा न करता गच्च्यांच्या कठड्यावर उभे राहून पतंगबाजीचा ‘स्टंट’ केला. तर काही लोक इतरांचा जीव धोक्यात घालून चक्क रस्त्यावर पतंग उडविताना दिसून आले.
पतंगबाजीची चक्क ‘कॉमेन्ट्री’ 

शहरातील काही भागांत तर पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दक्षिण नागपुरातील नवीन बाबूळखेडा भागात तर चक्क पतंग उडविताना गच्चीवर माईक व लाऊडस्पीकरच्या माध्यमातून ‘कॉमेन्ट्री’ करण्यात येत होती. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या ‘कॉमेन्ट्री’ला जोरदार दाद दिली. 

Web Title: Nagpur's sankrat 'sweet': with enthusiasm for air; 'O Kat ...' is Nineadele Asmant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.