नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 09:28 PM2018-04-20T21:28:41+5:302018-04-20T21:29:09+5:30

मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा कसा मिळणार, असा हल्ला आरोप माजी उपहमहापौर व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी शुक्रवारी महालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी केला.

Nagpur's mayor on administration is not 'dazed' | नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही

नागपूरच्या महापौरांचा प्रशासनावर ‘वचक ’नाही

Next
ठळक मुद्देभाजपाचे नगरसेवक सतीश होलेंचा आरोप : विरोधकडी भिडलेपाणीटंचाई वरून प्रशासनाला धरले धारेवर : प्रभाग ३१ चे पाणी माजी महापौरांनी पळविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पाणीटंचाईतून नागरिकांना दिलासा कसा मिळणार, असा हल्ला आरोप माजी उपहमहापौर व भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी शुक्रवारी महालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी केला. होले यांच्या आरोपामुळे सत्ताधारी विचारात पडले. याचा फायदा घेत काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी यांनीही महापौरांचा वचक नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
प्रभाग ३१ मध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या आहे. तक्रार करूनही प्रशासन व ओसीडब्ल्यू लक्ष देत नाही. माजी महापौर(प्रवीण दटके) यांनी आमच्या प्रभागाचे पाणी पळविल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. सत्तापक्षाचा नगरसेवक असल्याने हात बांधले आहे. आंदोलनही करता येत नाही. अशी व्यथा सतीश होले यांनी मांडली. होले यांच्या आरोपावर त्यांची फिरकी घेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले, सत्ताधारी असल्याने आंदोलन करू शकत नाही. पण निवेदन देऊ न समस्या तर मांडू शकता. विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रभाग २७ मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले होते. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. दूषित पाण्याची समस्या बाळाभाऊ पेठ, रामेश्वर, नारा, नारी, हसनबाग,सुदामपुरी, हसनबाग, मोमीनपुरा, दर्शन कॉलनी यासह अनेक वस्त्यात असल्याचे वनवे यांनी निदर्शनास आणले.
पाणीटंचाईमुळे नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे महापालिकेवर आर्थिक भूर्दंड बसतो. १२ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे भाजपाचे नगरसेवक प्रकाश भोयर यांनी निदर्शनास आणले. प्रवीण भिसीकर म्हणाले, प्रभाग ५ मध्ये नळाव्दारे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक टँकरची मागणी करतात. परंतु सकाळी मागणी केल्यानंतर रात्रीला टँकर येतो. दिव्या धुरडे यांनी सुदामपुरी भागात मागणी करूनही पुरेसे टँकर मिळत नसल्याची व्यथा मांडली.

Web Title: Nagpur's mayor on administration is not 'dazed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.