नागपूरच्या सीपी क्लबमधील मारहाण प्रकरण :आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:28 AM2018-11-20T00:28:38+5:302018-11-20T00:29:17+5:30

उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.

In Nagpur's CP Club assault case : the accused arrested | नागपूरच्या सीपी क्लबमधील मारहाण प्रकरण :आरोपीला अटक

नागपूरच्या सीपी क्लबमधील मारहाण प्रकरण :आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यावर केला होता प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.
मंगळवारी, ६ नोव्हेंबरच्या रात्री व्यापारी बांधवांनी सीपी क्लबमध्ये दिवाळी मिलनची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सदरमधील प्रतिष्ठित फर्निचर व्यापारी ब्रजेश सुशील खेमका त्यांच्या मित्रांसह सहभागी झाले होते. मध्यरात्रीनंतर सुमारे १ च्या दरम्यान खेमका बाथरूमला जात असताना त्यांना काही तरुणांमध्ये वाद होताना दिसला. वाद वाढू नये म्हणून खेमका यांनी सद्भावनेने त्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद करणाऱ्यांपैकी जसप्रीत तुली नामक आरोपीने खेमका यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. बाजूला असलेले काचेचे ग्लास उचलून खेमका यांच्या डोक्यावर फोडले. यामुळे खेमका यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, आरडाओरड ऐकून कार्यक्रमातील व्यापारीबांधव धावल्याने आरोपी जसप्रीत आणि त्याचे मित्र शिवीगाळ करून धमकी देत पळून गेले. खेमका यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांना गंभीर दुखापत असल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे सदर पोलिसानी आरोपी जसप्रीत तसेच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या घटनेला दोन आठवडे झाले आहे. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. आरोपींना पोलीस अटक करणार की नाही, असा प्रश्नही व्यापारी बांधवांमध्ये यानिमित्ताने चर्चेला आला होता. या पार्श्वभूमीवर, सदर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री जसप्रीत तुलीला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी लोकमतला सांगितले.

 

 

Web Title: In Nagpur's CP Club assault case : the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.