बेनी, नशे सा चढ गया ओये..; बेफिक्रे झाले डिस्को दिवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:15 AM2017-12-19T11:15:32+5:302017-12-19T11:17:01+5:30

बेनी दयाल. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला.

Nagpur youngsters rocking with Beni Dayal | बेनी, नशे सा चढ गया ओये..; बेफिक्रे झाले डिस्को दिवाने

बेनी, नशे सा चढ गया ओये..; बेफिक्रे झाले डिस्को दिवाने

Next
ठळक मुद्देतरुणांच्या जोशाला गगन ठेंगणे

आॅनलाईन लोकमत
नागपूर:
बेनी दयाल. तो दिसतो जितका वेगळा त्याचा आवाजही तितकाच वेगळा. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला. मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित त्याचा लाईव्ह इन कॉन्सर्ट पाहण्यासाठी दुपारी ४ पासूनच नागपूरकरांचे जत्थे स्टेडियममध्ये दाखल व्हायला लागले होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती.
अखेर तो क्षण आला. निवेदिकेने बेनी येत असल्याची वर्दी दिली. सगळे लाईट बंद झाले. म्युझिशियननी जागा घेतली. अवघे स्टेडियम स्तब्ध झाले. पण, बेनी काही दिसेचना. अचानक प्रकाशझोत सिलिंगवर गेला. बेनी वरून जम्प घेणार म्हणून साऱ्यांच्या नजरा वर. पुन्हा बेनी अदृश्यच. नेमके काय झाले कुणालाच कळत नसताना अचानक ड्रम जोरात वाजायला लागला आणि काळी पॅन्ट, काळा शर्ट, काळी टोपी अन् काळा चश्मा घातलेला बेनी बन के मुसीबत पिछे पडी हैं...या गाण्यावर अक्षरश: उड्या मारत स्टेजवर आला अन् पार्टी आॅल नाईटच्या मूडने आलेल्या तरुणाईने मोबाईलचे फ्लॅश लाईट आॅन करून त्याचे खास नागपुरी थाटात ग्रँड वेलकम केले. पुढे तब्बल दोन तास बेनीच्या गाण्यावर बेफिक्रे झालेल्या तरुणाईने बेनी, नशे सा चढ गया ओये...! म्हणत कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड फेर धरला.

Web Title: Nagpur youngsters rocking with Beni Dayal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.